#KolhapurRains प्रयाग चिखली गाव झाले तळे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

प्रयाग चिखली - येथे महापुराने हाहाकार उडवला आहे. गेली चार दिवस पुराने वेढल्याने गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हळूहळू स्थिती गंभीर होत आहे. सायंकाळपासून पाण्याची पातळी वाढून गावात सहा भाग पडले आहेत. सोमवारी सायंकाळी पूर्ण गावाला पुराने विळखा घातला असून वीज खंडित झाली आहे. घराघरांमध्ये पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांनी संसारिक साहित्याबरोबर गुरेढोरांना उंच ठिकाणी स्थलांतर केले आहे.

प्रयाग चिखली - येथे महापुराने हाहाकार उडवला आहे. गेली चार दिवस पुराने वेढल्याने गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हळूहळू स्थिती गंभीर होत आहे. सायंकाळपासून पाण्याची पातळी वाढून गावात सहा भाग पडले आहेत. सोमवारी सायंकाळी पूर्ण गावाला पुराने विळखा घातला असून वीज खंडित झाली आहे. घराघरांमध्ये पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांनी संसारिक साहित्याबरोबर गुरेढोरांना उंच ठिकाणी स्थलांतर केले आहे.

सोमवारी मध्यरात्री पातळी प्रचंड वाढल्यामुळे रात्रभर ग्रामस्थ भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले आणि कुटुंब दुमजली घराच्या माळ्यावर अडकले आहेत. बहुतेक लोक उंचवटे असणाऱ्या ठिकाणी घरांमध्ये मंदिरांमध्ये, शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. सरसकट वाहने बुडाली आहेत. जनावरांच्या छावण्यात पाणी शिरल्यामुळे जनावरे दाव्यासकट सोडून दिली आहेत.

लोकांना एकाच रात्रीत पाणी सतत वाढत असल्यामुळे लोकांना तीन तीन चार चार ठिकाणी स्थलांतर करावे लागले. दुभती जनावरे तीन फूट पाण्यात बांधली आहेत. जनावरे हवालदिल होऊन दोर कापून सोडून दिलेले आहेत. सध्या बहुतांश घरात पाणी असल्यामुळे धान्यासह कपडेलत्ते, दागदागिने, पैसे वस्तूही गहाळ झाले आहेत. संपूर्ण गाव तीन ठिकाणी उंचांवर सुरक्षित ठिकाणी एकवटला आहे.

गावांमध्ये पाच हजार लोकसंख्या असून गेली चार दिवस जिल्हा प्रशासनाकडे जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी यांत्रिक बोट, वैद्यकीय सेवा याबाबत मागणी करूनही साफ दुर्लक्ष केले आहे. महाभयंकर पूरस्थितीला एकाकी तोंड देत आहेत. दरम्यान गावांमध्ये मुख्य रोडवर सात फूट पाणी आल्यामुळे रोडला पंचगंगा नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इमर्जन्सी रुग्ण वृद्ध लोकांची गैरसोय होत आहे; पण यामुळे काही लोकांच्या भिंती घराच्या भिंती पडले आहेत.

सलग सातव्या दिवशीही पुराचे पाणी मंगळवारी सतत पडणाऱ्या पावसामुळे पुराचे पाणी वाढत असून कोणत्याही क्षणी मोठी जीवित हानी होऊ शकते .प्रशासनाने यांत्रिक बोट तसेच केलेली मदत ही अत्यंत ताकडी आहे. युद्धपातळीवर मदत करून लोकांचा जीव वाचवणे अत्यंत महत्वाची आहे .अन्यथा जीवित हानी व मोठी वित्तहानी होण्याची शक्‍यता आहे. चिखली मध्ये पूरस्थिती अत्यंत बिकट असून संपूर्ण घरात पाणी गेलेले आहे. सध्या पुराचे पाणी वाढत असून तातडीने लोकांना स्थलांतरित न केल्यास फार मोठी जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Rains Flood water enters in PrayagChikhali Village