आयुष्यभराच्या एकजुटीला आजाराचे ग्रहण

अशोक पाटील
शनिवार, 11 जानेवारी 2020

परिस्थिती कशी कुणावर येईल याचा नेम नसतो. लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले. गरिबीशी दोन हात करत दोन्ही भावंडे लहानाचे मोठे झाले. मोलमजुरी करून उदरनिर्वाह सुरू केला. एकमेकांच्या सुखःदुखात आधार देत दिवस काढले. गरिबीच्या हिंदोळ्यात नात्यातील लोकांनी पाठ फिरविली, पण मानलेल्यांनी आपलेपणाची ऊब दिली. अजूनही खडतर आयुष्याची झुंज त्यांची थांबली नाही. किणी (ता. चंदगड) येथील आप्पा मष्णू कुंभार व राजू मष्णू कुंभार या दोन सख्या भावांचा हा जीवन प्रवास आहे. दोघेही अविवाहित आहेत. शासनाने मंजूर केलेल्या घराचे काम अर्धवट असताना राजूची मानसिक स्थिती बिघडली.

कोवाड (कोल्हापूर) ः परिस्थिती कशी कुणावर येईल याचा नेम नसतो. लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले. गरिबीशी दोन हात करत दोन्ही भावंडे लहानाचे मोठे झाले. मोलमजुरी करून उदरनिर्वाह सुरू केला. एकमेकांच्या सुखःदुखात आधार देत दिवस काढले. गरिबीच्या हिंदोळ्यात नात्यातील लोकांनी पाठ फिरविली, पण मानलेल्यांनी आपलेपणाची ऊब दिली. अजूनही खडतर आयुष्याची झुंज त्यांची थांबली नाही. किणी (ता. चंदगड) येथील आप्पा कुंभार व राजू कुंभार या दोन सख्या भावांचा हा जीवन प्रवास आहे. दोघेही अविवाहित आहेत. शासनाने मंजूर केलेल्या घराचे काम अर्धवट असताना राजूची मानसिक स्थिती बिघडली.

 

हे पण वाचा - कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तानाजीचे पोस्टर उतरविले. सीमावासीयांमधून तीव्र संताप. सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

बिघडलेल्या मानसिक स्थितीतून राजूला बाहेर काढणे आणि अर्धवट राहिलले घर उभे करणे या चक्रात सापडलेल्या आप्पाला समाजाच्या आधाराची गरज आहे.
आप्पा आणि राजू या दोघांनीही वयाच्या 40 शीचा टप्पा पार केला आहे. 10 ते 12 वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. बहिनीचे लग्न झाल्याने घरी दोघेच राहिले. गरीब परिस्थितीमुळे दोघांचे शिक्षण अर्धवट राहिले. मोलमजुरी करून दोघेही एकमेकाला सावरू लागले. दिवसभर कामाला जायचे आणि रात्री घरी येऊन स्वयंपाक करून जेवन करायचे असा त्यांचा दिनक्रम आहे. हलाकीची परिस्थिती असल्याने नात्यातील लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे घरात सणवार कधी साजरे झालेच नाहीत. गावातील अनेकांनी त्यांना मायेचा आधार दिला. राजू गावात भाजीपाला विक्रीचे काम करू लागला तर आप्पा गवंड्याच्या हाताखाली काम करू लागला. गरिबीमुळे दोघेही अविवाहित राहिले. दररोज मजुरी केल्याशिवाय चूल पेटत नाही. गरिबी कितीही असली तरी दोघेही एकमेकांच्या आधारात राहतात. या वर्षी शासनाच्या घरकुल योजनेतून त्यांना घर मंजूर झाले आहे.

हे पण वाचा - त्यसंस्काराची तयारी झाली अन् मृत घोषित महिला उठून बसली... 
 

यासाठी अनेक मित्रांनी त्यांना मदतीचा हात पुढे केल्याने त्यांनी जुने घर पाडून नवीन घर बांधण्याचे काम सुरू केले आहे, पण पंधरादिवसांपूर्वी राजूची मानसिक स्थिती ढासळल्याने घराचे काम थांबले आहे. आयुष्यभर गरिबीशी संघर्ष करून पुढे आलेल्या राजूची आता बिकट अवस्था झाल्याने गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत
गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी राजूला रुग्णालयात दाखल करून आणले. राजू लवकर बरा व्हावा म्हणून अनेकजण प्रयत्न करत आहेत. त्याला जेवण व औषध देण्याचे कामही अनेकजन करत आहेत. एका बाजूला घराचे थांबलेले काम, तर दुसऱ्या बाजूला आजारी पडलेल्या भावाची भिस्त अशा कात्रीत आप्पा आहे. सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी मदतीचा हात पुढे केल्यास या सख्या भावांच्या जीवनाला नवी दिशा मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur raju kumbhar and his brother struggle for life