आज आवाहन, उद्या होणार गुन्हा नोंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

कोल्हापूर - फळांच्या हातगाड्या मार्केटमध्येच उभ्या करा, कपडे, सौदर्य प्रसाधने विक्री करण्यासाठी रस्त्यावर बसू नका. आज केवळ आवाहन केले आहे. उद्या थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाने आज दिला. महालक्ष्मी मंदिर परिसरातील जोतिबा रोडसह गर्दीच्या ठिकाणी शंभरहून अधिक हातगाडीवाल्यांना आज समज देण्यात आली.   

कोल्हापूर - फळांच्या हातगाड्या मार्केटमध्येच उभ्या करा, कपडे, सौदर्य प्रसाधने विक्री करण्यासाठी रस्त्यावर बसू नका. आज केवळ आवाहन केले आहे. उद्या थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाने आज दिला. महालक्ष्मी मंदिर परिसरातील जोतिबा रोडसह गर्दीच्या ठिकाणी शंभरहून अधिक हातगाडीवाल्यांना आज समज देण्यात आली.   

शहरातील वाहतुकीला शिस्त लागवी, यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न केवळ वाहनांबाबत करून चालणार नाहीत, तर ते रस्त्यावर फिरणाऱ्या हातगाड्यांनाही असावेत यासाठी, वाहतूक विभागाने आज जोतिबा रोडवरील शंभरहून अधिक हातगाडीवाल्यांना गाडी रस्त्यावर लावू नका, अशी समज दिली. उद्यापासून या गाड्या रस्त्याकडे उभ्या राहिल्या, तर तुमच्यावर गुन्हे दाखल केली जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. महालक्ष्मी मंदिर परिसरातील रस्त्यांवर हातगाड्यांची मोठी रेलचेल आहे. 

यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अनेक विक्रेते रस्त्यावरच भाजी, फळे, सौदर्य प्रसाधने, लिंबू, मिरच्या व कपडे विकण्यासाठी बसलेले असतात. यामुळे रंकाळा ते महालक्ष्मी मंदिर परिसरातील रस्ता गर्दीने तुडुंब भरलेला असतो. यातच केळी, सफरचंद, सीताफळ, बोरे विकणाऱ्या हातगाड्यांचीही भर पडलेली आहे. 

सर्वात रहदारीचा हा मार्ग रिकामा असावा, वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने आज शंभरहून अधिक विक्रेत्यांना रस्त्यावर साहित्यांची विक्री करू नका. जी जागा तुम्हाला ठरवून दिली आहे त्याच जागेवर तुम्ही थांबून व्रिकी करा, असे आवाहन केले. आजचा दिवस आवाहनाचा उद्या मात्र गुन्हा नोंद होणार असल्याचेही 
सांगण्यात आले.

विक्रेत्यांनीही विचार करावा
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. शहरात पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यांची वाहनेही शहरात येत आहेत. 

अशावेळी महत्त्वाच्या ठिकाणी आणि अरुंद रस्त्यावर हातगाड्या किंवा रस्त्यावर साहित्यांची विक्री करत बसल्यामुळे मोठी गर्दी होते, याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत असतो. 

त्यामुळे विक्रेते व हातगाडीवाल्यांनीही वाहतुकीबाबत विचार करावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रण पोलिसांनी केले. 

कारवाई सुरूच...
पापाची तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिरपर्यंत एकेरी वाहतूक आहे; पण  अनेक वाहनचालक हा नियम तोडून बिनखांबी गणेश मंदिरकडे जातात. आज अशा वाहतूकदारांवरही जोरदार कारवाई करण्यात आली.

Web Title: kolhapur rto crime