फूड फेस्टिव्हल हाउसफुल्ल....!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

खवय्यांची गर्दी ः तीनशेहून अधिक व्हेज-नॉनव्हेज पदार्थ दिमतीला

कोल्हापूर- तीनशेहून अधिक व्हेज-नॉनव्हेज पदार्थ दिमतीला असणाऱ्या येथील कोल्हापूर फूड फेस्टिव्हलला आज कोल्हापूरकरांनी हाउसफुल्ल गर्दी केली. ताराबाई पार्कातील सासने मैदानजवळील महाराणी हॉल (किरण बंगल्याशेजारी) येथे फेस्टिव्हल सुरू आहे. यानिमित्ताने कोल्हापूरकरांचे सहकुटुंब सेलिब्रेशन अनुभवायला मिळत असून, उद्या (रविवारी) अनेक चोखंदळ कोल्हापूरकर या महोत्सवाची पर्वणी साधणार आहेत.

दरम्यान, "सकाळ'ने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. "लोकल टू ग्लोबल' चवींची दुनिया एकाच छताखाली येथे अवतरली असून, सर्वांना मोफत प्रवेश आहे. हिरा ग्रुप ऑफ कंपनीज्‌ मुख्य प्रायोजक आहे. यश बेकर्स सहप्रायोजक आहे, तर न्यू गणेश कॅंटीन सर्व्हिसेस कॅंटीन पार्टनर व सोलाइफ न्युट्रिशन्स- सोया प्रॉडक्‍टस्‌ एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत.

मनपसंत पदार्थांवर ताव मारण्याबरोबरच मेलडीकिंग किशोर कुमार ते अर्जित सिंगपर्यंतच्या सदाबहार गीतांचा नजराणाही येथे उपलब्ध आहे. कॅराओके सिंगर मोहसिन यांच्या स्वरसाजातील गीतांच्या साथीने हा खाद्य महोत्सव रंगला असून, कोल्हापूरच्या खास खाद्यसंस्कृतीबरोबरच प्रोटिनयुक्त सॅण्डवीच, जिभेवर चव रेंगाळत ठेवणारे चाट आणि चायनीज, उन्हाळ्याचा गारवा कमी करणारे आइस्क्रीम, मिल्कशेकही येथे उपलब्ध आहेत. तांबड्या-पांढऱ्या रश्‍यासह खानदेशी नॉनव्हेज, कोंबडी वडे, मटण खिमा, तंदूर चिकनबरोबरच मच्छीचे विविध स्टॉलही उपलब्ध आहेत. पावभाजी, मिसळ, पुरणपोळी, मोदक, पिठलं-भाकरी, थालीपीठ, रोल डिलाईटवरही येथे मनसोक्त ताव मारता येते. त्याशिवाय दागिने, शूज स्टॅंड, सौंदर्य प्रसाधनांचे स्टॉल्सही प्रदर्शनात उपलब्ध आहेत. मुखशुद्धीसाठी बडीशेपपासून कंठसुधापर्यंत आणि विविध मसाल्यांपासून इचलकरंजीच्या भेळीपर्यंतच्या असंख्य व्हरायटींनी ही खाद्ययात्रा सजली आहे. चला, तर मग आजचा रविवारचा मुहूर्त साधूया...आवडत्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारू या...!

Web Title: kolhapur: sakal food festival