जाणून घ्या कोल्हापूर - सांगली पूर परिस्थितीचे अपडेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर -  जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच मिरज, वाळवा, शिराळा, पलूस सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. 

कोल्हापूर -  जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच मिरज, वाळवा, शिराळा, पलूस सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. 

दोन्ही जिल्ह्यातील पुरस्थितीचे अपडेट

•   कोल्हापूर  जिल्हयातील सर्व धरणे 100 टक्के भरली. 
•    कोल्हापूर : 11432 कुटुंबातील 51785 व्यक्तींचे स्थलांतर. 
•    सांगली : 10282 कुटुंबातील 53228 व्यक्तींचे स्थलांतर.
•    सांगली जिल्हयामध्ये प्रमुख राज्यमार्ग 6 प्रमुख जिल्हामार्ग 15 व इतर जिल्हा मार्ग 6  पाण्याखाली. 
•    कोल्हापूर जिल्हयामध्ये 104 बंधारे व 89 रस्ते पाण्याखाली. 

•    सांगलीमध्ये दोन तर कोल्हापूरमध्ये  दोघांचा मृत्यू.  
•    कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 NDRF पथके पोहोचली असून आणखी 6 NDRF पथके रवाना होत आहेत. 1 Navy  पथक पोहोचले आहे.
•    सांगली  जिल्हयामध्ये 3 एनडीआरएफ पथके पोहोंचली आहेत. आणखी 3 एनडीआरएफ पथके रवाना होत आहेत.
•   टेरीटोरियल आर्मीचे कोल्हापूरमध्ये 4 व सांगलीमध्ये 1 पथक कार्यरत. 
•    कोल्हापूर जिल्हयातील कागल व गडहिंग्लज या तालुक्यातील रस्ते चालु आहेत. इतर सर्व रस्ते बंद. 
•    सांगलीमध्ये 72 व कोल्हापूर 57 व सातारा 72 अशी एकुण 129 वैद्यकीय पथके कार्यरत. 

•    सांगली: स्थानिक 30 व 11, आर्मी 02 एकुण 43 बोटी
•    कोल्हापूर: स्थानिक 14 व एनडीआरएफ 7, आर्मी 4 व नेव्ही 4 एकुण 29 बोटी
•    सायंकाळी पाच वाजता सांगलीतील आयर्वीन पूलावर पाण्याची पातळी ५५ फुट ४ इंच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Sangli Flood Situation update