वंचितांना समाजाशी जोणारा "सेतू' 

kolhapur setu organisation help for handicapped
kolhapur setu organisation help for handicapped

आर.के.नगर - दिव्यांग व्यक्ती असोत की आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी त्यांना आपल्या क्षमतांचा विकास करणे शक्‍य होत नाही. पर्यायाने ते व्यक्तच होत नाहीत, अशा मुलांना सेतू संस्थेने मदतीचा हात दिला. संस्थेतर्फे गेल्या दहा वर्षे कर्णबधीर मुलांसाठी स्पिच थेरेपीच्या कार्यशाळा घेतल्या जातात. तर काही ठिकाणी नियमीतपणे संस्कारवर्गही चालतात. या सामाजिक उपक्रमांमुळे वंचीत घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा "सेतू' अशीच संस्थेची ओळख बनली आहे. 

सेतू संस्थेचे कार्य 2009 पासून सुरू आहे. सुरुवातीला संस्थेने कर्णबधीर मुलांसाठी स्पिच थेरपी सुरू केली. काहीशी खर्चिक असणारी ही थेरपी अनेक पालकांना परवडत नाही. त्यामुळे मग त्यांच्या पाल्यामधील क्षमतांचा विकास थांबतो. समाजातील या घटकाची ही गरज लक्षात घेऊन, या थेरपी कार्यशाळा सुरू झाल्या. मुलांना ऐकू येत नसल्याने त्यांना बोलता येत नाही. म्हणून मग त्यांच्याकडून उच्चार करून घेणे, त्यांना शब्द उच्चारायला शिकवणे हे कार्यशाळेत केले जाते. यामुळे त्या मुलांना थोडे फार व्यक्‍त होता येते. कर्णबधीर मुलांची सहल, विविध स्पर्धा, व्यक्तीमत्व विकासासाठीचे विविध उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. अत्तापर्यंत सुमारे 350 कर्णबधीर मुलांना या कार्यशाळांचा लाभ झाला आहे. उषा कुलकर्णी, वासंती हंकारे, स्नेहल सप्रे यांच्या प्रयत्नातून या कार्यशाळा होतात. त्यानंतर संस्थेतर्फे या मुलांच्या पुर्नवसनासाठीही प्रयत्न केले जातात. त्यांना काम मिळवून देणे, एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करू देणे, अशा प्रकारे ही सेतू मदत करत असते. 
झोपडपट्टी भागात पालक दिवसभर कामावर गेलेले असतात. अशा वेळी शाळेच्या वेळा व्यतिरिक्त मुले त्याच परिसरात असतात. वाईट संगतीला लागून मुले चुकीच्या गोष्टी करण्याची शक्‍यता असते. याशिवाय त्यांचा अभ्यास घेणारेही कोणी नसते. याचा विचार करून सेतू संस्थेने अशा भागात संस्कार वर्ग सुरू केले. यामध्ये मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात. तसेच त्यांचा रोजचा अभ्यासही घेतला जातो. निता वालावलकर आणि भाग्यश्री शेवाळे या संस्कार वर्ग घेतात. यातून या मुलांना व्यवहारज्ञान मिळते, आत्मविश्‍वास निर्माण होतो. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो. असे अनेक सकारात्मक बदल त्यांच्यात घडतात. सेतू संस्थेचे कार्य वरकरणी जरी छोटे वाटत असले तरी त्याचे सामाजिक परिणाम मोठे आहेत. समाजातील एका वंचीत घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेतू संस्था काम करते. 

स्पीच थेरपीमुळे कर्णबधीर मुलांना उच्चार करता येतात. काही जणांच्यात जाणवण्या इतपत फरक पडतो. त्यामुळे आम्ही अशा कार्यशाळा घेण्याचे ठरवले. कर्णबधीर मुलामुलींच्या जीवनात यामुळे आश्‍वासक बदल घडतो. याचे काम करताना समाधान वाटते. 
- शशांक देशपांडे (संचालक, सेतू संस्था) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com