घरी उशीरा का आल्याचे विचारल्याने मुलाकडून वडिलांचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

पिरसाब महंमद मुल्ला (वय 55,रा.शाहू कॉलनी, विक्रमनगर) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी पिरसाब यांचा मुलगा रफिक पीरसाब मुल्ला (वय 30) याला अटक केली. याबाबतची फिर्याद आरोपीची बहिण सब्जाबी मुल्ला यांनी राजारापुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी खुनासाठी वापरलेला चाकू जप्त केला. 

कोल्हापूर - घरी वेळाने का येतो असा जाब विचारल्याचा कारणावरून काल रात्री विक्रमनगरात मुलग्यानेच बापावर चाकूने वार करून खून केला.

पिरसाब महंमद मुल्ला (वय 55,रा.शाहू कॉलनी, विक्रमनगर) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी पिरसाब यांचा मुलगा रफिक पीरसाब मुल्ला (वय 30) याला अटक केली. याबाबतची फिर्याद आरोपीची बहिण सब्जाबी मुल्ला यांनी राजारापुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी खुनासाठी वापरलेला चाकू जप्त केला. 

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वतः पिरसाब, मुलगा रफीक आणि अस्लम हे तिघेही विक्रमनगर मध्ये एकाच घरी राहतात. सेंट्रीग हा त्यांचा व्यवसाय आहे. दोन दिवसापूर्वी सेंट्रींगचे काही पेैस मिळाले होते तेही रफीककडेच होते. त्यावरूनही काल सकाळी आणि सायंकाळी रफिक आमि पिरसाब यांच्यात वाद झाला होता. तेंव्हाही रफीककडे चाकू होता. वादानंतर तो घरातून त्यांच्या मार्केट यार्ड येथे राहणाऱ्या चुलत्यांकडे गेला. तेथे त्याने चुलता अकबर मुल्ला यांच्या हातावर चाकू मारला. "का मारलास' अशी विचारणा चुलत्याने केल्यावर "ट्रायल' पाहिली असे त्याने सांगितले. यानंतर तो तेथून निघून गेला. दारू पिऊन रात्री अकरा-साडेअकराच्या सुमारास घरी गेला. तेथे सर्वजण झोपले होते. लवकर दार उघडत नाहीत म्हणून रफिने दारावर लाथा मारणेस सुरवात केली. अखेर वडील पिरसाब यांनी दरवाजा उघडला.

यावेळी आलेल्या रागातून रफिकने वडील पिरसाब यांच्या छातीवर, दंडावर, पोट्यात असे चार चाकूचे वार केले. घटना पाहताच सर्वांच भितीने ओरडू लागले. कामगार शब्बीर वाटंगीने रफीककडून चाकू काढून घेतला. शेजारी राजू पाटील यांनी त्याला घरातून बाहेर काढले. तेथून तो पळून गेला. पिरसाब यांना तातडीने सीपीआर मध्ये दाखल केले. 
दरम्यान राजारापुरी पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिस घरी जावू पर्यंत रफिकने पुन्हा घरात जावून सिलींग फॅन वाकविला. फ्रीजसह प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली. आणि पोलिसांच्या भितीने शेजारील तीन क्रमांकाच्या गल्लीत पळून गेला. दरम्यान रात्री उशिरा पिरसाब यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर पोलिसांनी तातडीने रफिकला शोधून रात्री अडीचच्या सुमारास अटक केली. त्याने वापरलेला चाकू ही जप्त केला.

Web Title: kolhapur : son killed Father, asking why the house is late