दिव्यांग विद्यार्थ्यांचा अनोखा कलाविष्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

स्वाभिमान संघटनेचा उपक्रम - 400 मुलांनी घेतला सहभाग 

कोल्हापूर -  स्वाभिमान संघटनेतर्फे आज हुतात्मा पार्क येथे दिव्यांग, मतिमंद, गतिमंद व अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. 400 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एक वेगळाच आनंद लुटला. 

कार्यक्रमात हेल्पर ऑफ दि हॅंडिकॅप, समर्थ विद्यामंदिर, दिलीपसिंह घाटगे बालग्राम, चेतना विकास मंदिर, ज्ञान प्रबोधन भवन संचलन अंधशाळा, स्वयंम मतिमंद मुलांची शाळा, जिज्ञासा विकास मंदिर, राही पुनर्वसन केंद्र, बाल कल्याण संकुल, अंबप येथील आस्था चॅरिटेबल इन्स्टिट्यूट मुलींची शाळा आदी शाळांतील 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. हिंद प्रतिष्ठानच्या 30 जणांच्या पथकाने सर्वांना मानवंदना देऊन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवली. स्पॉट गेम, मॅजिक शो, कलागुण सादरीकरण, चित्रकला, डान्सचा अनुभव त्यांनी घेतला. व्यासपीठावर गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनी स्वागत केले. सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरणाचा समारंभ झाला. उपाध्यक्ष संजय साळोखे यांनी आभार मानले. या वेळी कविता कोंडेकर, प्रशांत पाटील, शक्ती सारंग, वैशाली महाडिक, राजश्री कर्णिक, सचिन खांडेकर, वंदना आळतेकर, सुनील मुळे, अनिल लांबोरे, बबन वडगावकर, मधू दिंडे, बबलू ठोंबरे, बाळू सादिलगे, राजू घोटवडे आदी उपस्थित होते. 
 
Web Title: kolhapur students