कोल्हापूर-तिरुपती विमान आजपासून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

कोल्हापूर - कोल्हापूर-तिरुपती विमान सेवा आज (ता. १२)पासून सुरू होत आहे. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी विमान तिरुपतीकडे रवाना होणार आहे. इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-हैदराबाद व तिरुपती मार्गावर विमानसेवा कोल्हापुरातून सुरू झाली आहे. त्याला प्रवाशांचा उंदड प्रतिसाद लाभत आहे. तिरुपतीची पहिली फेरी हाऊसफुल्ल झाली असून, ही विमानसेवा सक्षमपणे चालण्यास मदत होणार आहे.

उडान योजनेतून कोल्हापूर-हैदराबाद व कोल्हापूर-बंगळूर मार्गावर विमानसेवा सुरू आहे. त्यासोबत कोल्हापूर-हैदराबाद व तिरुपती या मार्गावर इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरू होत आहे. यातील पहिल्या फेरीसाठी बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे, अनेकजण सहकुटुंब पर्यटनाला निघाले आहेत. काही कुटुंब तीर्थाटनाचाही आनंद घेत आहेत. यातही दक्षिण भारतातून कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा वर्ग मोठा आहे. अशा वर्गाला तिरुपती-हैदराबाद-कोल्हापूर ही विमानसेवा उपयुक्त ठरणार आहे, तर कोल्हापुरातून अनेकजण तिरुपतीच्या दर्शनाला जातात. त्यांनाही या विमान सेवेचा लाभ चांगला होईल. त्यामुळे पहिल्याच फेरीपासून कोल्हापूर-तिरुपतीच्या बुकिंगला कोल्हापूर परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

काहीजण सपत्नीक विमानसेवेचा लाभ घेण्यासाठी तसेच तिरुपतीच्या दर्शनाला जाणार आहेत. अशांची संख्या पहिल्या फेरीत अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. हैदराबाद येथून सकाळी व तिरुपतीवरून दुपारी विमान कोल्हापूरसाठी उडाण भरणार आहेत.

दरम्यान, मुंबईतील स्लॉटच्या अडचणींमुळे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. ही विमानसेवा तातडीने सुरू होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Tirupati air service from today