एनएमएमएस शिष्यवृत्तीत कोल्हापूर अव्वल

Smart-Student
Smart-Student

सेनापती कापशी - केंद्र सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत कोल्हापूर जिल्हा अव्वल राहिला आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ४१२० विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. त्यांना वर्षाला चार कोटी ९४ लाख ४० हजार रुपये रकमेप्रमाणे एकूण १९ कोटी ७७ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. २००८-०९ पासून सुरू झालेल्या परीक्षेत दरवर्षी पात्र विद्यार्थी संख्या वाढतच आहे. 

प्रतिवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे चार वर्षांत ४८ हजार रुपये मिळत असल्याने अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना नववी ते बारावीचे शिक्षण घेणे सोईचे होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून ४४८ विद्यार्थ्यांचा कोटा आहे. मात्र, इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक गुणवत्ता येथील विद्यार्थ्यांनी सिद्ध केल्याने ते ट्रान्स्फर शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत. त्यामुळे त्यांना इतर जिल्ह्यांतील कोट्यातून अतिरिक्त शिष्यवृत्ती मिळत आहे. हा अंक जिल्ह्याच्या ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक आहे. 

परीक्षेचे स्वरूप
पेपर १ - मानसिक क्षमता चाचणी (GMAT)
 १०० प्रश्न १०० गुण, वेळ - दीड तास
पेपर २ - शालेय क्षमता चाचणी (SAT)
 १०० प्रश्न १०० गुण, वेळ - दीड तास
 उत्तीर्ण अट - ४० टक्के गुण सर्वसाधारण गट
 ३५ टक्के गुण मागास गट विद्यार्थी
 ८ वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न
 ६० टक्के सोपे, २० टक्के मध्यम व २० टक्के कठीण

तीन वर्षांतील पात्र विद्यार्थी
 २०१५-१६ ः ७६२५ (१११९ पात्र विद्यार्थी) 
 २०१६-१७ ः ८३०० (१६०१ पात्र विद्यार्थी) 
 २०१७-१८ ः १०२३२ (१४०० पात्र विद्यार्थी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com