शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अजूनही ‘नो एन्ट्री’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - तीन अधिसभा होऊनही कुलगुरू नियुक्त दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अधिसभेवर सदस्य म्हणून अद्याप नियुक्ती झालेली नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अधिसभेत प्रश्न मांडणार कोण? अशी विचारणा होत आहे. आठ ते नऊ महिन्यांपूर्वी अधिसभा अस्तित्वात आली असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अजून ‘नो एन्ट्री’ का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍टची अंमलबजावणी होऊन वर्ष उलटले आहे. विविध अधिकार मंडळे अस्तित्वात आली असून अधिसभेचा कोरम पूर्ण होणे बाकी आहे. शिक्षकेतर कर्मचारी संघटना व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा प्रत्येकी एक सदस्य अधिसभेत नियुक्त होणे महत्त्वपूर्ण आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिसभा व्यासपीठ आहे. परीक्षा विभागाकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मानधन वाढ असो किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया, या प्रश्नांना अधिसभेत वाचा फोडणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे कुलगुरूंनी नामनिर्देशित करायची आहेत. मात्र कित्येक दिवस सदस्य नियुक्तीचा खेळखंडोबा सुरू आहे. 

कोरम पूर्ण भरला का?
सदस्य होण्याच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने ‘फिल्डिंग’ लावली आहे. जिल्ह्याचे ‘पालक’ आपल्याला नक्कीच मदत करतील आणि सदस्य पदाची माळ गळ्यात टाकतील, अशी आशा त्यांना आहे. सदस्य नियुक्तीचे त्रांगडे मात्र झाले आहे. तीन अधिसभा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सदस्यांव्यतिरिक्त झाल्याने अधिसभेचा कोरम पूर्ण भरला आहे, असे म्हणता येईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: kolhapur university Teaching staff no entry