vijay-patkar
vijay-patkar

कोल्हापूरच्या मराठी चित्रपटाचे वैभव पुन्हा मिळवू 

कोल्हापूर - ""कोल्हापूर मराठी चित्रपटांची जननी आहे. अलीकडच्या काळात येथील चित्रपटनिर्मितीला मरगळ आली आहे. कधी काळी दर्जेदार चित्रपट देणाऱ्या या गावाचे हरविलेले चित्रपटनिर्मितीचे वैभव पुन्हा खेचून आणण्याची क्षमता येथील कलावंत व तत्रंज्ञानात आहे. अशा कलावंत-तंत्रज्ञांनी एकत्र येऊन नव्या संस्थेची उभारणी केली आहे. त्याचा उपयोग करून चित्रपट उद्योग अधिक समृद्ध करू या,'' असे मत अभिनेते विजय पाटकर यांनी येथे व्यक्त केले. 

येथील पाडळकर मार्केटमध्ये मराठी नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ मल्टिपर्पज संस्थेची आज स्थापन करण्यात आली. कोल्हापूर शहरातील चित्रपट कलावंत व तंत्रज्ञांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली आहे. त्याचे उद्‌घाटन श्री. पाटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार प्रमुख उपस्थित होते. 

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, " गेली 32 वर्षे कोल्हापूरला चित्रपटनगरी व्हावी अशी मागणी करीत आहोत. शासन आता सात-आठ कोटी रुपये खर्चून येथे चित्रनगरी तयार करीत असल्याचे सांगत आहे; पण आम्हाला सात कोटी रुपयांची चित्रनगरी नको आहे, तर शासनाने तीनशे ते चारशे कोटी रुपये खर्चून चित्रनगरी विकसित करावी. यामुळे येथील अनेक कलावंत, तंत्रज्ञानांच्या जगण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल. त्यामुळे केवळ मी एकट्याने पाठपुरावा करून उपयोग होणार नसून सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत.'' 

श्री. संजय पवार म्हणाले, ""कोल्हापूर मराठी चित्रपटांची समृद्ध परंपरा आहे. येथील चित्रपट उद्योगाने हजारो कलावंत व तंत्रज्ञानांना रोजगार दिला आहे. यापुढे हा उद्योग येथे समृद्ध व्हावा, त्यातून येथील कलावंत तंत्रज्ञांना रोजगार मिळावा यासाठी कलावंत तंत्रज्ञ यांची संघटन शक्ती बळकट होणे आवश्‍यक आहे.'' 

या वेळी भाजपचे महानगरप्रमुख संदीप देसाई, सुभाष भुर्के, चित्रपट निर्माते दिग्दर्शक सतीश रणदिवे, इम्पतियाज बारगीर, सतीश बिडकर, मिलिंद अष्टेकर, सुरेश जरग आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com