esakal | कोल्हापूर : जिल्हा परिषदेची उद्याची सभा मॅट, सतरंजी घोटाळ्यावरून होणार वादळी 
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची उद्याची सभा मॅट, सतरंजी घोटाळ्यावरून होणार वादळी 

कोल्हापूर - शिक्षण विभागाने केलेला मॅट घोटाळा, यातच चुकीच्या पद्धतीने आपसी बदली करून निर्माण केलेला वाद आणि हे कमी होते की, काय म्हणून केलेला सतरंजी घोटाळा, डीसीपीएसबाबत वित्त विभागाने केलेली दिशाभूल आदीमुळे मंगळवारी (ता. 3) होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजण्याची चिन्हे आहेत. महिला सदस्यांच्या पतींबाबत कर्मचाऱ्यांनी केलेली तक्रार सदस्यांच्या जिव्हारी लागली असून या तक्रारीचे परिणाम आता कोणाकोणाला भोगायला लागणार हे, या सभेत पहायला मिळणार आहे. 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची उद्याची सभा मॅट, सतरंजी घोटाळ्यावरून होणार वादळी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शिक्षण विभागाने केलेला मॅट घोटाळा, यातच चुकीच्या पद्धतीने आपसी बदली करून निर्माण केलेला वाद आणि हे कमी होते की, काय म्हणून केलेला सतरंजी घोटाळा, डीसीपीएसबाबत वित्त विभागाने केलेली दिशाभूल आदीमुळे मंगळवारी (ता. 3) होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजण्याची चिन्हे आहेत. महिला सदस्यांच्या पतींबाबत कर्मचाऱ्यांनी केलेली तक्रार सदस्यांच्या जिव्हारी लागली असून या तक्रारीचे परिणाम आता कोणाकोणाला भोगायला लागणार हे, या सभेत पहायला मिळणार आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवारी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही निर्णयाच्या दृष्टीने अखेरची सभा असणार आहे. या सभेच्या अनुषंगाने विविध मंजुऱ्या, पूरबाधित गावांतील मदत कार्य, या अनुषंगाने सदस्य कामात होते. मात्र कर्मचारी संघटनांनी महिला सदस्यांचे पती कामात हस्तक्षेप करतात, असे विधान करुन एकच खळबळ उडवून दिली आहे. सदस्यांच्या या अवमान प्रकरणी सर्वपक्षीय सदस्यांनी हम सब एक है, असा नारा दिला आहे. आता हे सर्व सदस्य एकत्र आल्याने याचा दणका कोणाला बसणार, कोणते अधिकारी रडारवर असणार हे सभेवेळीच समजणार आहे. 

शिक्षण विभागाने शिंगणापूर क्रीडा प्रशालेत कुस्तीसाठी मॅट खरेदी केली; मात्र ही मॅट कुस्तीची नव्हेच असा तज्ज्ञ समितीने अहवाल दिला आहे. त्यामुळे मॅट घोटाळ्याची चर्चा सभागृहात झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. सुमारे 16 लाखांची ही मॅट खरेदी असून यात 4 लाखांचा आंबा पाडल्याचेही सांगण्यात येत आहे. तर नुकताच सतरंजी घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. 50 लाखांची सतरंजी खरेदी झाली असली तरी निम्म्या शाळांना त्या मिळालेल्या नाहीत. मग ही सतरंजी गेली कोठे? अशी विचारणा होऊ लागली आहे. गट शिक्षणाधिकारी जबरदस्तीने शिक्षकांकडून सतरंजी मिळाले असल्याचे लिहून घेत आहेत. अशा गट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईसाठी दबाव येण्याची शक्‍यता आहे.

loading image
go to top