दहावीच्या निकालात कोल्हापूर विभाग दुसरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

कोल्हापूर - फेब्रुवारीमध्ये झालेल्या दहावी परीक्षेत राज्यात कोल्हापूर विभागाने सलग सहाव्यांदा द्वितीय क्रमांक पटकाविला.‌ विभागाचा निकाल ९३.८८% लागला. 

कोल्हापूर जिल्ह्याचा ९५.३५, सातारा ९३.४३ व सांगली जिल्ह्याचा ९२.२५% लागला. परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६१ तर मुलांचे ९२.४८% इतके राहिले. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.२९% वाढ झाली. विभागातील ६८१ शाळांचा निकाल १००% लागला. विशेष म्हणजे यंदा परीक्षा केंद्रांवर ७६ गैरप्रकरणे उघडकीस आली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, राज्यात कोकण विभागाने निकालात प्रथम क्रमांकाची परंपरा कायम राखली. या विभागाचा निकाल ९६% लागला.

Web Title: Kolhapur Zone II in Class X results