कोल्हापूर जिल्हा परिषद स्वच्छतेत भारी

ZP-Kolhapur
ZP-Kolhapur

कोल्हापूर - केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा परिषद भारी ठरली. दोन-तीन वर्षांत जिल्हा परिषदेची या उपक्रमात झालेली घसरण या वर्षी भरून काढण्यात आली. जिल्हा परिषदेने देशात द्वितीय व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. 

या स्पर्धेत देशात गिरिधीह (झारखंड) प्रथम, कोल्हापूर (महाराष्ट्र) द्वितीय आणि तृतीय क्रमांक पेडापल्ली (तेलंगण) या जिल्ह्याला मिळाला.
ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणात देशभर शौचालये बांधण्यात आली; मात्र ही शौचालये नीटनेटकी व स्वच्छ नसल्याचे; तसेच अनेक शौचालये वापरात नसल्याचे अनेक सर्वेक्षणांत दिसून आले होते.

त्यामुळेच केंद्र सरकारने स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन केले. जिल्हा परिषदेच्या या कामगिरीचे सर्वेक्षण झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिली; तर देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे गुरुवारी (ता. २०) जाहीर करण्यात आले. नवी दिल्ली येथे सोमवारी (ता.२४) विज्ञान भवनात स्वच्छता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे बक्षीस वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com