Kolhapur : अकरा लाखांचे कोकेन इस्लामपूरजवळ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur : अकरा लाखांचे कोकेन इस्लामपूरजवळ जप्त

Kolhapur : अकरा लाखांचे कोकेन इस्लामपूरजवळ जप्त

सांगली/इस्लामपूर : जिल्ह्यातील वाघवाडी फाटा येथे एका खासगी बसमधून अकरा लाखांचे कोकेन विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या परदेशी तरुणास सांगली पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. माकेटो जॉन झाकिया (वय २५, रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे १० लाख ९० हजार रुपये किमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. दरम्यान, माकेटोला आज मंगळवार (ता. ३०) पर्यंत कोठडी मिळाली. माकेटो रात्री खासगी ट्रॅव्हल्स (केए ५१ एएफ ६२९१) मधून कोकेन (अमली पदार्थ) जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती तासगाव पोलिस ठाण्यातील सागर लवटे यांना खबऱ्याकडून मिळाली.

माकेटो मुंबईतून-बेंगळूरला निघाला होता. पथकाने वाघवाडी फाटा (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सापळा लावला. गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्या ठिकाणी बस आली. त्यावेळी बसची झडती घेत त्याला पोलिसांनी त्याच्या साहित्यसह ताब्यात घेतले. त्याच्या साहित्यात निळ्या रंगाची सॅक होती. अमली पदार्थ व दोन मोबाईल असा ऐवज पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केला.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

अशी करत होता तस्करी

माकेटो गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. कोकेन विक्रीसाठी बंगळूरला निघाला होता. त्यासाठी त्याने कॅप्सूलमध्ये कोकेन ठेवले होते. ते कॅप्सूल व्हॅ‍सलीनच्‍या बॉटलमध्‍ये ठेवून तस्करी करत होता. तशी कबुली त्याने दिली आहे. यापूर्वी त्याच्यावर अशाप्रकारचे काही गुन्हे असण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

loading image
go to top