कोल्हापूर : परदेशात ११.३९ लाख विद्यार्थी

शिक्षणाचे निमित्त; सर्वाधिक विद्यार्थी दुबई, अमिरातीत
Russia Ukraine War
Russia Ukraine War Sakal

कोल्हापूर : वैद्यकीयसह अभियांत्रिकी व विविध विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देशातील तब्बल ११ लाख ३९ हजार ७४९ विद्यार्थी जगाच्या पाठीवर विविध देशात शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे यात पाकिस्तानातही देशातील २३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.दरम्यान, सर्वाधिक २ लाख १९ हजार विद्यार्थी दुबईसह युनायटेड अरब अमरातीत आहेत. त्याखालोखाल अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रोलिया व सौदे अरेबियात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. युद्धभूमी बनलेल्या युक्रेनमध्ये ४४ हजार ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात, यापैकी १८ हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना युद्धभूमीतून परत मायदेशी आणण्याचे आव्हान केंद्र सरकारसमोर आहे.

त्यातच या युद्धावेळी झालेल्या हल्ल्यात कर्नाटकातील एका विद्यार्थ्यांचा युक्रेनमध्ये मृत्यू झाल्याने या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती घेतली असता देशातील तब्बल ११ लाख ३९ हजार विद्यार्थी शिक्षणासाठी देशाबाहेर आहेत. ही आकडेवारी जुलै २०२१ ची आहे, त्यानंतर परदेशात गेलेल्यांची संख्या वेगळीच. याशिवाय नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात असलेल्या भारतीयांची संख्याही मोठी आहे. पंजाबमधून नोकरी व व्यवसायासाठी तब्बल १५ लाख तरुण परदेशात आहेत. नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हाही मुद्दा महत्त्वाचा होता. यातील बहुंताशी तरुण हे कॅनडामध्ये आहेत, कॅनडाचे नागरिकत्व लगेच मिळत असल्याने तरुणांची पसंती या देशाला आहे.

देशनिहाय भारतीय (आकडे जुले २०२१ पर्यंतचे)

दुबईसह आखातातील देश - २ लाख १९ हजार कॅनडा - २ लाख १५ हजार ७२० अमेरिका - २ लाख ११ हजार ९३० ऑस्ट्रोलिया - ९२ हजार ३०० सौदी अरेबिया - ८० हजार इंग्लंड - ४४ हजार४०० ओमान - ४३ हजार न्युझीलंड - ३० हजार चीन - २३ हजार जर्मनी - २० हजार युक्रेन - १८ हजार फिलीपाईन्स - १५ हजार कझाकिस्तान - ५ हजार ३०० इटली - ४ हजार ६३४ ब्राझील - ४ तुर्की - ४८

युक्रेनला पसंती का

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण देणारी ३३ महाविद्यालये आहेत. या देशात वैद्यकीयसाठी प्रवेश परीक्षा नाही, थेट प्रवेश मिळतो. भारतात वैद्यकीयचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी (६ वर्षांचा खर्च) ६५ लाख ते १ कोटी रुपये खर्च येतो. युक्रेनमध्ये हेच शिक्षण २२ ते २५ लाखांत पूर्ण होते. युक्रेनमध्ये शिक्षण पूर्ण जगात कुठेही प्रॅक्टीस करण्याची परवानगी आहे. म्हणूनच वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पसंती युक्रेनला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com