कोल्हापुरात कोरोनामुळे 2 बालके अनाथ तर 173 जणांना एकच पालक

जिल्हाधिकारी दौलत देसाई; बाधित मुलांना शहरात एकाच ठिकाणी व्यवस्था करा
कोल्हापुरात कोरोनामुळे 2 बालके अनाथ तर 173 जणांना एकच पालक

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनामुळे (covid-19) आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने 2 बालके अनाथ झाली. तर 173 मुलांनी आपल्या आई-वडिलांपैकी एक पालक गमावला आहे. दरम्यान, आई-वडिलांच्या मृत्यूमुळे जे बालके अनाथ झाले तसेच, एक पालक असणाऱ्या शहरी आणि ग्रामीण (village area) भागातील बालकांना शासनाच्या योजनेचा तात्काळ लाभ मिळाला पाहिजे. यासाठी त्यांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना लाभ मिळवून द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत (daulat desai) देसाई यांनी आज दिल्या. जिल्ह्यातील कोरोना बाधित मुलांना शहरात एकाच ठिकाणी उपचार देता येतील, असे हॉस्टेलची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देसाई यांनी आज दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणाच्या (child protection) दृष्टीने गठित केलेल्या टास्क फोर्स (कृती दल) बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अनेक बालकांना आई-वडिलांना गमावले आहे. ज्या बालकांना एकच पालक आहेत, अशांना शासनाची योजना लागू केली जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेने तात्काळ सर्व्हे केला पाहिजे.

कोल्हापुरात कोरोनामुळे 2 बालके अनाथ तर 173 जणांना एकच पालक
तलवार हल्ल्यात तरूण गंभीर; 9 जणांवर गुन्हा

सर्व्हे करण्यात कोणतीही दिरंगाई करु नये. भविष्यातही अशा बालकांचा शोध घ्यावा. त्यांच्या नोंदी ठेवाव्या, अशा सूचना देसाई यांनी दिल्या. ज्या संस्थांमधील कर्मचारी किंवा इतरांना लसीकरण झाले नसल्यास तात्काळ ते पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल माळी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे व विधी सल्लागार उपस्थित होते. 

दरम्यान जिल्ह्यातील कोरोना बाधित बालकांसाठी कोल्हापूर शहरात एकाच ठिकाणी एका हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करावी. या बालकांकडे दुर्लक्ष होवू नये याची काळजी सर्वच यंत्रणेने घ्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

कोल्हापुरात कोरोनामुळे 2 बालके अनाथ तर 173 जणांना एकच पालक
Video - लाडक्या ताईच्या पाठवणीसाठी भावांची भन्नाट 'आयडिया'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com