esakal | इचलकरंजी पालिकेच्या चतुर्थ श्रेणी, निवृत्तांना बाप्पा पावला
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी पालिकेच्या चतुर्थ श्रेणी, निवृत्तांना बाप्पा पावला

इचलकरंजी पालिकेच्या चतुर्थ श्रेणी, निवृत्तांना बाप्पा पावला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इचलकरंजी: पालिकेला सहाय्यक अनुदान मिळाल्यानंतरही तृतीय श्रेणीतील तब्बल २०० कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या वेतनासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. १ कोटी १७ लाखाची रक्कम वेतन राखीव निधीकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी व निवृत्त कर्मचारी यांचे वेतन देण्यात आले आहे. परिणामी, ऐन सणासुदीच्या दिवसात तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यास विलंब होत आहे.

हेही वाचा: कोल्हापूर: मनपातर्फे १६० कृत्रिम विसर्जन कुंड

पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची देयदेणी थकली होती. ही देणी देण्यासाठी वेतन राखीव निधीचा वापर करण्यात आला होता. या निधीतून सात कोटीपेक्षा जास्त रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देयदेणी भागविण्यासाठी करण्यात आला होता. यासाठी परवानगी देतांना जिल्हाधिकारी यांनी सहा हप्त्यात ही रक्कम पून्हा वेतन राखीव निधीत जमा करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते.

दरम्यान, शासनाकडून सहाय्यक अनुदानापोटी ६ कोटी ५८ लाखांचा निधी इचलकरंजी पालिकेला प्राप्त झाला. त्यापैकी १ कोटी १७ लाखाचा पहिला हप्ता वेतन राखीव निधीकडे वर्ग करण्यात आला. उर्वरीत ५ कोटी ४१ लाख निधीतून पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी (२ कोटी ८७ लाख) व सेवानिवृत्त कर्मचारी (२ कोटी ३८ लाख) यांचे ऑगस्ट महिन्यांचे वेतन भागविण्यात आले. मात्र तृतीय श्रेणीतील २०० कर्मचाऱ्यांचे वेतन मात्र प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ऐण सदासुदीच्या दिवसांत या कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

तब्बल ९७ लाखाची गरज

तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तब्बल ९७ लाखाची आवश्यकता भासणार आहे. सर्व कर्मचारी कार्यालयीन सेवेतील आहेत. सध्या पालिकेकडे आवश्यक निधी नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

loading image
go to top