दंगल उसळली असताना ZP चा मोठा निर्णय; 'त्या' 69 मुस्लिम मुलांना पाठवणार बिहारला! Kolhapur Riots | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

69 Muslim Children

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागानं बिहार सरकारशी (Bihar Government) संपर्क करून या मुलांच्या पालकांचा शोध घेतला. त्यांना हा सारा प्रकार सांगितला.

Kolhapur Riots : दंगल उसळली असताना ZP चा मोठा निर्णय; 'त्या' 69 मुस्लिम मुलांना पाठवणार बिहारला!

कोल्हापूर : बिहारमधून (Bihar) आजऱ्याच्या मदरशात (Madrasa) शिकण्यासाठी आणलेल्या ६९ मुलांना त्यांच्या घरी पाठवलं जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागानं मुलांच्या पालकांशी संवाद साधून हा निर्णय घेतला.

लवकरच मुलांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. पुणे- बंगळूर महामार्गावर (Pune-Bangalore Highway) एका ट्रकमधून मदरशामध्ये नेल्या जाणाऱ्या ६९ मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांची रवानगी तात्पुरती चाईल्ड लाईनमध्ये केली होती.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागानं बिहार सरकारशी (Bihar Government) संपर्क करून या मुलांच्या पालकांचा शोध घेतला. त्यांना हा सारा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी मुलांना परत पाठवण्यास सांगितलं. त्यानुसार आता पुढील काही दिवसांत मुलांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) अधिकारी शिल्पा पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान, कोल्हापुरात एका आक्षेपार्ह पोस्टवरुन दंगल उसळली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज परिस्थिती पूर्वपदावर आहे.