इच्छाशक्ती आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर 87 व्या वर्षी कोरोनावर मात

एकही रेमेडिसिव्हर इंजेक्‍शन न घेता ते ठणठणीत बरे झाले आहेत
इच्छाशक्ती आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर 87 व्या वर्षी कोरोनावर मात

कोल्हापूर : इच्छाशक्ती आणि आत्मविश्‍वासावर सिध्दनेर्ली (ता. कागल) येथील 87 वर्षाच्या रामचंद्र बाळू पोवार यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ऑक्‍सिजन बेड नाही, व्हेंटिलेटर लागणार अशी कारणे देत त्यांना खासगी रुग्णालयात ऍडमिट करुन घेतले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या केआयटी कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी, डॉक्‍टर, नर्सिंग, वॉर्डबॉय यांनी केलेल्या उपचारमुळे ते आज ठणठणीत बरे होवून घरी परतले. विशेष म्हणजे पोवार यांच्या प्रकृती चिंताजनक असतानाही एकही रेमेडिसिव्हर इंजेक्‍शन न घेता ते ठणठणीत बरे झाले आहेत.

कोरोना आजारावर उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना खासगी दवाखाने परवडणारे नाहीत. वडिलांवर होणारे उपचार, प्रकृती आणखी बिघडू नये म्हणून पोवार यांच्या घरच्यांनीही त्यांच्या उपचारासाठी प्रयत्न केले. यादरम्याना त्यांना बेड किंवा व्हेंटिलेटर मिळाले नाही. त्यामुळे कुटुबियांनी त्यांना गोकुळ शिरगाव (ता. करवीर) अंतर्गत असणाऱ्या केआयटी कॉलेज कोविड सेंटिरमध्ये दाखल आले. दरम्यान, डॉक्‍टरांनी कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर काळजीपूर्वक उपचार केले. यासाठी, केआयटी कोविड सेंटरचे मुख्य अधिकारी डॉ. संतोष चौगले, तालुका अधिकारी गुणाजी नलवडे, प्रकाश आलासे, डॉ. विजय बरगे यांच्यासह कोविड सेंटरमधील सर्व नर्स, वॉर्डबॉय यांनीही परिश्रम घेतले. 

इच्छाशक्ती आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर 87 व्या वर्षी कोरोनावर मात
फिलिपाईन्स, इंडोनेशियातील 'काळे तांदूळ' आरोग्यासाठी ठरताहेत फायदेशीर

पोवार यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचे आरोग्य कार्ड असे होते :

  • ऍडमिट- 21 मे 2021

  • कोरोना चाचणी - पॉझिटिव्ह

  • एचआरसीटी स्कोअर- 40 पैकी 19

  • ऑक्‍सिजनचे प्रमाण- 68 टक्के

  • डिस्चार्ज - 2 जून 2021 

मुलाने मानले डॉक्‍टर, नर्सिंगचे आभार

"डॉ. संतोष चौगले यांच्या सर्व टिमने माझ्या वडिलांवर योग्य उपचार केले. त्यामुळे माझे वडिल आज ठणठणीत बरे झाले आहेत."

- बाळासाहेब पोवार, सिध्दनेर्ली.

इच्छाशक्ती आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर 87 व्या वर्षी कोरोनावर मात
चहाची तलप महागात! विलगिकरणातील पॉझिटिव्ह चहासाठी एकाच्या घरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com