Amit Shah: शहांच्या सुरक्षेचा कोल्हापूरकरांना फटका

भाजपकडून लोकसभेचे तगडं नियोजन अमित शहा, सीएम शिंदे, फडणवीस, आज कोल्हापुरात
Amit Shah: शहांच्या सुरक्षेचा कोल्हापूरकरांना फटका

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थासह लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने भाजपकडून महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते कोल्हापूरला जाणार आहेत. (Amit Shah Kolhapur visit)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (दि. 19) कोल्हापूर दौरा आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या दौऱ्यानिमित्त कोल्हापूरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या या सुरक्षेचा फटका कोल्हापूरकरांना बसताना दिलत आहे.

अमित शाह ज्या-ज्या परिसरामध्ये कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्या परिसरातील नागरिकांना उद्या घराबाहेर पडायचे असेल तर त्यासंबंधी माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. इतकच नाही तर आधार कार्ड झेरॉक्स सुद्धा पोलिस ठाण्यात जाऊन जमा करावे लागणार आहेत. विनाकारण घराबाहेर पडता येणार नाहीये. याबाबत कोल्हापूर पोलिसांनी आदेशच काढला आहे.

कसा आहे शाहांचा कोल्हापूर दौरा?

अमित शहा यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आज दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी पुण्याहून हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळावर येणार आहेत. यानंतर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपासून ते 2 वाजून 15 मिनिटांपर्यंत अर्धा तास ते अंबाबाई मंदिरात असणार आहेत.

तेथून ते 2.30 वा. मध्यवर्ती शिवाजी चौक येथे येतील. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते दसरा चौकात येऊन राजर्षी शाहू छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करतील. दुपारी 2.40 ते 3.10 पर्यंत त्यांचा राखीव वेळ असेल.

दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पेटाळा मैदान येथे न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांच्या पत्नी सौ. सोनल शहा यांनी याच संस्थेच्या प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. सायंकाळी साडेचारपर्यंत हा कार्यक्रम आहे.

सायंकाळी 5 वाजता त्यांच्या हस्ते भाजपच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात बांधण्यात येणाऱ्या गणपती मंदिराची पायभरणी करण्यात येणार आहे. त्याचवेळी विजय संकल्प रॅलीला ते मार्गदर्शन करणार आहेत. आर. व्ही. ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.

रात्री 8 वाजता भाजपच्या निवडक 150 प्रमुख पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. ही बैठक एक तास चालणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com