esakal | "गोकुळ' च्या आणखी एका ठरावदारांचा कोरोनाने मृत्यु; शिरोळ तालुक्‍यात खळबळ

बोलून बातमी शोधा

'गोकुळ' च्या आणखी एका ठरावदारांचा कोरोनाने मृत्यु; शिरोळ तालुक्‍यात खळबळ
'गोकुळ' च्या आणखी एका ठरावदारांचा कोरोनाने मृत्यु; शिरोळ तालुक्‍यात खळबळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे "गोकुळ' च्या शाहुवाडी तालुक्‍यातील एका ठरावदारांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच शिरोळ तालुक्‍यातील 71 वर्षीय आणखी एका ठरावदारांचाही काल (ता. 20) रात्री उशीरा कोरोनामुळे मृत्यु झाला. संबंधितांवर जयसिंगपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.

दोन दिवसांपुर्वी डोणोली (ता. शाहूवाडी) येथील ठरावदारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. हे ठरावदार एका बॅंकेचे शाखाधिकारी होते, त्यांच्या संपर्कात आलेल्या बॅंकेतील आठ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ही घटना ताजी असतानाच काल रात्री उशीरा बुबनाळ (ता. शिरोळ) येथील विकास सोसायटीचे चेअरमन व "गोकुळ' च्या ठरावदारांचे कोरोनामुळे निधन झाले.

पंधरा दिवसांपुर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने सुरूवातील मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण त्याठिकाणी प्रकृत्तीत काही फरक न पडल्याने त्यांना जयसिंगपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांची प्रकृत्ती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच काल (ता. 20) मध्यरात्री त्यांचे निधन झाले. आज पहाटे त्यांच्या पार्थिवावर अंकली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सलग दहा वर्षे त्यांनी बुबनाळचे सरपंच म्हणून काम केले आहे.

पंधरा दिवसापुर्वी दक्षिणेकडील एका तालुक्‍यात "गोकुळ' च्या पाठिंब्यासाठी झालेल्या मेळाव्यानंतर आठ ते दहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात या मेळाव्याच्या आयोजकांसह माजी जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश होता. ही घटना ताजी असतानाच डोणोली (ता. शाहूवाडी) येथील ठरावदारांचा कोरानामुळे मृत्यु झाला. तोपर्यंत काल रात्री जयसिंगपूर येथे आणखी ठरावदार कोरोनाचे बळी ठरले.

Edited By- Archana Banage