esakal | सोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त? 

बोलून बातमी शोधा

Lenders need to tear off
सोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त? 
sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 
4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह्यातील वेगळेपण ठरणार आहे. 

गेली 18 वर्षे हा घाट रस्ता होण्याबाबत चर्चा सुरू होती. यासाठी मार्ग प्रकल्प विभागाने सर्व्हेक्षण केले. पहिला टप्प्यात घाट रस्ता तयार करण्याचे नियोजन झाले, आणि 2016 ला सर्व प्रशासकीय मान्यता मिळाल्या. सर्व परवानग्या घेणे, अटींची पूर्तता करणे हा एक टप्पा आणि प्रत्यक्षात काम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत दुसरा टप्पा दोन असे काम विभागले आहे. 

वन विभागासह अन्य विभागाच्या परवानग्या, अटींचे पालन करण्याचा हा मुद्दा सर्व्हेक्षणानंतर उपस्थित झाला. यात केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी आवश्‍यक होती. राज्य शासनाकडील हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला. 20 ऑगस्ट 2018 ला याला परवानगी मिळाली. यावेळी वन्यजीव विभागाची परवानगी घेण्यासाठी हा प्रस्ताव भारतीय वन्यजीव संस्था (डेहराडून) (एनबीडल्ब्यूएल) येथे पाठविला. तेथून त्याला 29 ऑगस्ट 2019 ला परवानगी मिळाली. मात्र त्यात 18 अटी घालण्यात आल्या. सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठानला प्रकल्प किंमतीच्या दोन टक्के म्हणजे 4 कोटी 20 लाख रुपये देण्याची मुख्य अट होती. 

राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात चार कोटी 20 लाख रुपये रस्त्यासाठी मंजूर होणे अपेक्षीत आहे. ही रक्कम व्याघ्र प्रकल्पाला दिल्यानंतर नागपूर वन्यजीव विभागाकडून अंतिम मंजुरी मिळेल. या रस्त्यासाठी आवश्‍यक सर्व प्रशासकीय मंजुऱ्या मिळाल्या आहेत. आवश्‍यक निधी मिळालाल्यानंतर तातडीने महिन्या-दोन महिन्यात हे काम सुरू होऊ शकेल. 
-तुषार बुरूड, कार्यकारी अभियंता. 
- आर.बी.माळी , उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) 

केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवगेळ्या अटींसह वन्यजीव विभागाच्या सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी पाच वर्षे पाठपुरावा केला आहे. वन्यजीव विभागाला द्यावयाची चार कोटी 20 लाखांची तरतूद येत्या अर्थसंकल्पात होईल. मार्चनंतर पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होईल. घाट रस्त्यासाठी वारंवार बैठका घेऊन हे काम मार्गी लावले आहे. 
- आमदार प्रकाश आबिटकर 

ठळक 
*एकूण 12 किलोमीटरचा घाट 
*साडेआठ किलोमीटर वनक्षेत्र 
* जंगलातून 1100 मीटर फ्लायओव्हर 
*मडकुडाळ, घाटगे, सोनवडे, नाईकवाडी, शिवडाव असा मार्ग 
* मुंबई-गोवा महामार्गावर पंडुर येथे जोडणार 
* 10 मीटर उंच फ्लाय ओव्हर 
हत्तींचा कळप फ्लायओव्हरखालून ये-जा करू शकतो