विशाळगडावर पशू-पक्षांची हत्या करून त्यांचं अन्न शिजवण्यास बंदी; पुरातत्त्व विभागाचा मोठा निर्णय I Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Vishalgad

यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमुख शैलेश बलकवडे यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

Kolhapur : विशाळगडावर पशू-पक्षांची हत्या करून त्यांचं अन्न शिजवण्यास बंदी; पुरातत्त्व विभागाचा मोठा निर्णय

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील विशाळगडावर (Kolhapur Vishalgad) मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, दारु आणि गांजा विक्री तसंच सेवन करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्यानं प्रतिबंध करण्याची मागणी होत होती.

दरम्यान, यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमुख शैलेश बलकवडे यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पाच पथकांकडून विशाळगडावर विशेष मोहीमही राबवण्यात आली होती.

आता विशाळगडावरील (Vishalgad Fort) कायदा सुव्यवस्था आणि विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागानं (Archaeology Department) पुढाकार घेत एक आदेश जारी केला आहे. किल्ले विशाळगडावर पशू-पक्षांची हत्या करून त्यांचं अन्न शिजवण्यास बंदी घालण्यात आलीये.

याशिवाय, अमली पदार्थांच्या व्यवसायावरही बंदी घातली आहे. पुरातत्व विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत होत आहे.