इचलकरंजीत खळबळ : हनी ट्रॅपने घेतला दुसरा बळी; यड्रावातील घटना

इचलकरंजीत खळबळ : हनी  ट्रॅपने घेतला दुसरा बळी; यड्रावातील घटना
इचलकरंजीत खळबळ : हनी ट्रॅपने घेतला दुसरा बळी; यड्रावातील घटनाsakal,Google

इचलकरंजी : शहरात हनी ट्रॅपचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका तरुणाने हनी ट्रॅपला कंटाळून आत्महत्या केली. सागर बाबुराव रणवंरे (Sagar Ranvare) (वय 25 रा यड्राव) असे त्याचे नाव आहे. महिन्याभरातील इचलकरंजी (Ichalkaranji) ही दुसरी घटना घडली आहे.

इचलकरंजीत खळबळ : हनी  ट्रॅपने घेतला दुसरा बळी; यड्रावातील घटना
राज्यातील शाळांची दिवाळी सुट्टी बदलली ; अचानक बदलाने प्रशासन गोंधळात

यड्राव (ता. शिरोळ) येथे सागर हा आपल्या कुटुंबासमवेत राहतो. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी आढळून आलेल्या त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आले. या माहितीनुसार हनी ट्रॅपला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. अधिक तपास शहापूर पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com