esakal | बेळगावात घरांवर फडकले भगवे ध्वज; मतदानाला उत्साहात सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

Belguam Election

बेळगावात घरांवर फडकले भगवे ध्वज; मतदानाला उत्साहात सुरुवात

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेसाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली असून कोरे गल्ली शहापूर येथील मराठी भाषिक आपल्या घरांवर भगवे ध्वज लावून मतदानासाठी बाहेर पडले आहेत. तसेच इतर ठिकाणी देखील सकाळपासूनच मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या 58 प्रभागांसाठी शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वच प्रभागांमध्ये चुरशीची लढत असल्याने सर्वच उमेदवारांकडुन मतदान जास्त प्रमाणात व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी मतदार यादीतील घोळ कायम असल्याचे दिसून येत असून प्रभाग रचना करण्यात आल्यानंतर अनेकांची नावे गायब झाल्याचे दिसून येत असून काहींची नावे दुसर्‍या प्रभागात आल्यामुळे नागरिकांना आपले नाव शोधण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. अनेक उमेदवारांनी टेबल मांडले असून कार्यकर्ते नागरिकांना बोलावून मतदार यादीतील क्रमांक शोधून देत आहेत.

हेही वाचा: औषधे घ्यायचे विसरताय? मिळेल आता सूचना ; निखिल पडतेंचे संशोधन

गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची निविदा सत्ता राहिली आहे. मात्र यावेळी समितीसह भाजप, काँग्रेस, आप देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का वाढेल असे मत व्यक्त होत आहे.

आपला मराठी बाणा दाखवत कोरे गल्ली शहापूर येथील नागरिकांनी आपल्या घरांवर भगवे ध्वज लावून मतदान करण्यास सुरुवात केली असून कोरे गल्ली तर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे मराठी भाषीकातून स्वागत होत आहे. तसेच घरांवर भगवे ध्वज लावल्यामुळे हा परिसर भगवामय झाल्याचे पहावयास मिळत आहे.

loading image
go to top