esakal | धक्कादायक! क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेण्याचा प्रकार उघड; सहा जणांवर गुन्हा

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेण्याचा प्रकार उघड; सहा जणांवर गुन्हा
धक्कादायक! क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेण्याचा प्रकार उघड; सहा जणांवर गुन्हा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : टी-20 क्रिकेट सामान्यावर बेटींग घेण्याचा प्रकार राजारामपुरी पोलिसांनी शाहूनगर येथील बारवर छापा टाकून मंगळवारी रात्री उघडकीस आणला. टीव्हीवरील सामना पाहून बेटींग घेणाऱ्या तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह एक लाख दोन हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे

सुजित कांतीलाल ओसवाल (वय 43), दिनेश लिलाबचंद ओसवाल (वय 45, दोघे रा. प्रतिभानगर), अजित रतनलाल ओसवाल (वय 40, रा. गंगावेश), बार व्यवस्थापक - संदीप नलवडे, बुक्की मालक - सौरभ कदम व एस. मोमीन अशी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती,

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा सध्या सुरू आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपीटल या दोन संघात सामाना सुरू होता. एकीकडे राज्यात संचारबंदी सुरू आहे. तरीही हा सामना टीव्हीवर पाहून फोनवरून बेटींगचा जुगार शाहूनगर येथील विकास बार येथे सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी येथे छापा टाकला. येथे संशयित सुजित, दिनेश व अजित ओसवाल हे तिघे क्रिकेट बेटींगचा जुगार खेळ खेळत असताना मिळून आले. त्याच्याकडून सात हजाराची रोकड, तीन किमंती मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 1 लाख 2 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बारचा व्यवस्थापक संशयित संदीप नलवडे आणि बुक्की मालक संशयित सौरभ कदम व एस. मोमीन अशा सहा संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सचिन देसाई, महेश पोवार, सुरेश काळे, सत्यजित सावंत, प्रविण आवडे यांनी केली.

Edited By- Archana Banage