esakal | भारत बंद : कोल्हापूर-रत्नागिरी हायवेवर रास्ता रोकोI Bharat Band
sakal

बोलून बातमी शोधा

भारत बंद

भारत बंद : कोल्हापूर-रत्नागिरी हायवेवर रास्ता रोको

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांबवडे : शाहुवाडी येथे आज भारत बंद आंदोलनासाठी संमिश्र प्रतिसाद मिळाला असुन यानिमित्ताने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी नविन कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचे नसून ते रद्द करावे या मागणी बरोबरच बांधकाम कामगार, श्रमिक, मजूर, असंघटीत कामगार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करत असल्याचे भाई भरत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: आरोग्य विभाग परीक्षा प्रकरण: न्यासा कंपनीने केला खुलासा

बांबवडे येथे आज शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह भाई भारत पाटील, राजेंद्र देशमाने, राजू मगदूम, नामदेव पाटील, तुकाराम पाटील, अॅड प्रणव थोरात, भैय्या थोरात, विशाल पाटील, प्रकाश साठे, अवधूत जानकर, मनोगत- भाई भारत पाटील, राजू मगदूम, तुकाराम तळप, तुकाराम खुटाळे, पंचम सुतार, शामराव पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शाहुवाडी पोलीस विभागचे उपाधिक्षक रवींद्र साळोखे शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील उपस्थित राहून त्यांनी आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्त तैणार केला होता.

loading image
go to top