कोल्हापूरात कोट्यावधीचा कचरा घोटाळा; भाजपचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra pollutiion control board
कोल्हापूरात कोट्यावधीचा कचरा घोटाळा; भाजपचा आरोप

कोल्हापूरात कोट्यावधीचा कचरा घोटाळा; भाजपचा आरोप

कोल्हापूर : झूम प्रकल्पावरील(zoom project) कचरा(garbage) बेकायदेशीरपणे नेऊन कसबा बावड्यातील शेतात टाकण्याचा प्रकार आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे(pollution control board) त्यांनी तक्रार दिली. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शेतात जावून पंचनामा केला. शेताची उंची वाढवण्यासाठी हा कचरा टाकला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता हा प्रकार सुरू असून यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार(Corruption) झाल्याचा आरोप भाजपने(bjp kolhapur) पत्रकातून केला आहे.

हेही वाचा: धक्का कुणाला? निकालाची उत्सुकता शिगेला; सत्तारूढ विरुद्ध शिवसेनेत चुरस

भाजपचे पदाधिकारी आज दुपारी प्रदूषण नियंत्रण मंडळात गेले. त्यांनी उपप्रादेशीक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर फिल्ड ऑफिसर अर्जुन जाधव यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याबाबत भाजपने पत्रकात म्हटले आहे, २०२० पासून कचरा हलवण्यास सुरुवात झाली असून आजपर्यंत १ लाख टन कचरा हलवला आहे. हा कचरा कायदेशीर प्रक्रिया न राबवता बावड्यातील शेतात टाकला जातो. यासाठी शेतकऱ्यांकडून लाखो रुपये घेतले जातात.

मनपा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदाराला पैसे देते. यावर कारवाई करावी. अजित ठाणेकर, विजय खाडे पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, डॉ.सदानंद राजवर्धन, धीरज पाटील, राजाराम परीट, विवेक कुलकर्णी, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, आशिष कपडेकर, धीरज उलपे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कोल्हापूर : खातेफोड नसल्याने परिसराचे एकच कार्ड

हा कचरा नसून तो कचऱ्याचा सुका भाग आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवरून तो शेतात टाकला जातो. यात काही बेकायदेशीर नाही. शेतात टाकलेल्या कचऱ्याच्या सुक्याभागात प्लॅस्टिक आढले. त्याबद्दल ठेकेदाराला नोटीस पाठवली जाईल. या ठिकाणी सुपरवाईजर नेमण्यासही सांगण्यात आले आहे.

- डॉ.विजय पाटील, नोडल अधिकारी, घनकचरा प्रकल्प.

हेही वाचा: कोल्हापुरात तिसऱ्या लाटेचा धोका अटळचं; मंत्री हसन मुश्रीफ

कचरा विनापरवाना, विनाप्रक्रिया बाहेर नेणे, परनवागी नसलेल्या जागी तो टाकणे हे गैर आहे. महापालिका ठेकेदाराला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पैसे देते. मात्र ठेकेदार हा कचरा विकून बेकायदेशीरपणे पैसे घेतो. यात भ्रष्टाचार आहे.

- अजित ठाणेकर,

माजी नगरसेवक.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top