esakal | कौटुंबिक तक्रारींना लॉकडाउनमध्ये ब्रेक 
sakal

बोलून बातमी शोधा

 Break into family complaints lockdown

पुन्हा एकत्र राहायचे आहे, मदत करा, विभक्त कुटुंबाची गाठ पुन्हा बांधा, अशी विनंती विभक्त कुटुंबाने जिल्हा समुपदेशन केंद्राकडे केली. केंद्राच्या पुढाकारातून लॉकडाउनमध्ये दुरावलेली सुमारे 18 नाती पुन्हा बांधली गेली. 

कौटुंबिक तक्रारींना लॉकडाउनमध्ये ब्रेक 

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : एकमेकांचे विचार पटले नाहीत म्हणून विभक्त झालो. कोरोना संकट काळात रक्ताच्या नात्याची किंमत काय असते, ती आम्ही जाणली. सासूमध्ये आईची माया तर सुनेमध्ये मुलगीचे प्रेम, कसे अनुभवायचे ते समजले. पुन्हा एकत्र राहायचे आहे, मदत करा, विभक्त कुटुंबाची गाठ पुन्हा बांधा, अशी विनंती विभक्त कुटुंबाने जिल्हा समुपदेशन केंद्राकडे केली. केंद्राच्या पुढाकारातून लॉकडाउनमध्ये दुरावलेली सुमारे 18 नाती पुन्हा बांधली गेली. 

शहरातील एका सामान्य कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचे लग्न झाले. चार दिवसांच्या संसारानंतर सासू सुनेच्यात खटके उडू लागले. दररोजच्या या कटकटीचा साऱ्यांनाच त्रास होऊ लागला. संसार टिकतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. हे प्रकरण जिल्हा महिला बाल विकास विभाग कोल्हापूरअंतर्गत जिल्हास्तरीय समुपदेशन केंद्राकडे गेले. तेथील समुपदेशकांनी सर्वांचे समुपदेशन करून मने स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. अखेर मुलाने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. काही महिने ते विभक्त राहिले. तसे कोरोनाचे संकट आले. लॉकडाउन लागू झाला. तशी बंद घरात प्रत्येकाला नात्याची किंमत कळू लागली. त्या दोघांच्या पुढाकाराने हे कुटुंब पुन्हा समुपदेशन केंद्राकडे आले. त्यांनी आम्हाला एकत्रच राहायचे, असा अग्रह धरून पुन्हा संसाराची घडी बसवली. 
अवास्तव्य खर्चाला बगल देऊन कमीत कमी पैशात जिवाभावाच्या नात्यांबरोबर चांगले जीवन जगता येते. 
हे सर्वांनाच उमगून आले. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत अवघ्या मोजक्‍यात कौटुंबिक तक्रारी समुपदेश केंद्राकडे आल्या आहेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. जी. काटकर, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले, युवा ग्रामीण विकास संस्था अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पौर्णिमा कोठावळे व नंदकुमार निर्मळे निर्गतीकरण करत आहेत. 


लॉकडाउनमध्ये घरातील मंडळी एकत्र आली. त्यांना एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. नात्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण होऊ लागला. हेच कौटुंबिक तक्रारी कमी होण्याचे फलित म्हणावे लागेल. 
- पौर्णिमा कोठावळे, समुपदेशक 

loading image
go to top