व्यवसाय वृद्धीचा स्टार्टअप फायद्याचा ; मिम्स, व्हिडिओतून व्यवसायांची जाहिरात

सोशल मीडियावरून व्यवसाय वृद्धीसाठीही व्यवसायांची जाहिरात ; बेराजगारांच्या हाताला काम, दिल्लीपर्यंतचे व्यवसाय
business
businesssakal

कोल्हापूर : प्रमोशनचाही स्टार्टअप आता सुरू झाला आहे. याची आयडिया ऑनलाईनवर उपलब्ध झाली. कोल्हापूरपासून दिल्ली, गुजरातपर्यंत ठिकठिकाणी सुरू असलेले व्यवसाय यू ट्यूब, फेसबुकसह सोशल मीडियावर दिसतात. सोशल मीडियावरून व्यवसाय वृद्धीसाठीही व्यवसायांची जाहिरात आता स्टार्टअप म्हणून पुढे येत आहे. विशेष करून ‘मिम्स’ला मागणी वाढती आहे.

कोल्हापुरातील काही तरुणांनी सोशल मीडियावरील प्रमोशनचा स्टार्टअप सुरू केला आहे. तुमच्या व्यवसायाची जाहिरात करून व्यवसाय वाढविण्यासाठी ते प्रयत्न करतात. एवढेच नव्हे, तर त्या व्यवसायातून इतरांना प्रवृत्त केले जाते. यासाठी यू ट्यूबवर खास चॅनेल आहेत. यात गुजरातपासून अमृतसर, दिल्लीपर्यंत व्यवसायाची माहिती दिली जाते. प्रत्यक्षात उत्पादन सुरू असलेल्या ठिकाणचा व्हिडिओ, त्या मालकांशी चर्चा, हाच व्यवसाय तुम्ही कसा करू शकता?, यासाठी कच्चा माल कोठून दिला जाईल?, तो पक्का करून त्याची विक्री कशा पद्धतीने करायची? याचीही माहिती चॅनेलवर दिली जाते. यातून सुमारे दीड हजारांहून अधिक किलोमीटरवरील व्यवसाय थेट कोल्हापुरात करता येतो. यात फसवणूक नको म्हणून कच्चा माल घरी पोचल्यावर पैसे देण्याची व्यवस्थाही काही व्यावसायिकांनी दिली आहे. आणि विशेष म्हणजे केवळ ऑनलाईन व्यवसायाचे प्रमोशन करीत आहेत. यातून एकाच ठिकाणी सुरू असलेला व्यवसाय इतरांनाही करण्यासाठी प्रवृत्त करून बेरोजगारी कमी करण्यास मदत होत आहे.

एखाद्या व्यवसायाचे प्रमोशन करण्यासाठी आवश्‍यक सोशल मीडिया वापरण्याचीही कला आहे. त्यातूनच माझा स्टार्टअप सुरू झाला. ‘मिम्स’द्वारे सोशल मीडियावर प्रमोशनचे काम सुरू केल्याने माझ्या ज्ञानाचा फायदा इतरांनाही होतो. त्यातून चांगले पैसे मिळतात आणि इतरांच्या व्यवसायाचेही प्रमोशनही होते.

- सुमीत पाटील, पाचगाव रोड

इतरांच्या व्यवसायाचा व्हिडिओ बनवून देणे, तो सोशल मीडियावर अपलोड करून त्यांच्या व्यवसायाला आपण प्रमोट करण्याचा व्यवसाय केला आहे. यातून माझा स्टार्टअप सुरू झालाच, यातून बेरोजगारांना व्यवसाय मिळाला आणि ज्यांनी व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना काम मिळाले. पार्टटाईम हा स्टार्टअप सुरू करता येतो. केवळ ऑनलाईन प्रमोशन हा व्यवसाय बनला आहे.

- राजेंद्र हंकारे, गगनबावडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com