कोल्हापूर - टेंबलाईवाडी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार I Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

चालकाने प्रसंगावधान ओळखून ही मोटार रस्त्याच्या एका बाजूला नेली.

कोल्हापूर - टेंबलाईवाडी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : टेंबलाईवाडी शाळेजवळ आज चालत्या मोटारीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान ओळखून चालकाने ही कार रस्त्याकडेला नेऊन त्यातून आपली सुटका करून घेतली. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले. त्यांनी ही आग वेळीच अटोक्यात आणली.

हेही वाचा: इचलकरंजी - SB गॅंग म्होरक्या सुदर्शन बाबरला डबल मोका

याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेली माहिती, एक पांढऱ्या रंगाची मोटार उचगाव मार्गाच्या दिशेने जात होती. येथील शाळेजवळ या मोटारीने अचानक पेट घेतला. तशी परिसरातील नागरिकांनी ओरडा केला. चालकाने प्रसंगावधान ओळखून ही मोटार रस्त्याच्या एका बाजूला नेली. त्याचबरोबर ते वेळीच मोटारीतून निसटले. याची माहिती समजात घटनास्थळी ताराराणी चौकातील अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली. जवानांनी ही आग अटोक्यात आणली. पण या आगीत सुमारे ४० हजाराचे नुकसान झाले. ही मोटार साईक्स एक्स्टेशन परिसरातील जितेंद्र पटेल यांची असल्याची माहिती पुढे आली आहे. पण मोटारीला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. ही आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे रवी ठोंबरे, माणिक कुंभार, संभाजी ठेपले, उमाजी निकम यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा: 'पार्ट टाइम मुख्यमंत्री' या भाजपच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर

loading image
go to top