भरधाव कारची दुचाकीला धडक; कोल्हापुरातील युवक जागीच ठार

भरधाव कारची दुचाकीला धडक; कोल्हापुरातील युवक जागीच ठार
Summary

यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारकारने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली.

नेर्ले : कासेगाव (ता. वाळवा) येथील आशियायी महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल आशीर्वाद जवळ महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून मोटारकारने दिलेल्या धडकेत कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाचा जागीच मृत्यू झाला. सुधीर शिवाजी कदम (वय २५) (रा. कुंडलवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. कासेगाव पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. मोटारकार चालक सीताराम प्रकाश नारकर (वय २७) (रा. फणसगाव, नारकवाडी ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (सद्या रा.ठाणे) याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

भरधाव कारची दुचाकीला धडक; कोल्हापुरातील युवक जागीच ठार
'भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय 'ते' वक्तव्य'

दरम्यान कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी ४ च्या सुमारास आशियाई महामार्गावर असणाऱ्या कासेगाव येथील आशीर्वाद हॉटेल जवळील महामार्गावरून सुधीर कदम दुचाकीवरून पुण्याकडे जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारकारने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत सुधीर कदम हे दुचाकीवरून खाली पडले. अपघातात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कदम हे पुणे येथे नोकरी करतात. घटनास्थळी कासेगाव पोलिसांनी धाव घेत कारचालकाला ताब्यात घेतले. कारचालक सीताराम नारकर याच्यावर भरधाव वेगाने कार चालवणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत कासेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com