
हातकणंगलेत सेंट्रीग कामगाराचा निर्घृण खून
हातकणंगले (कोल्हापूर) : नेज ( ता. हातकणंगले )(Nej)येथील राजू वसंत जाधव , वय 38 या सेंट्रीग कामगाराचा(centring worker)डोक्यात दगड घालून निघृण खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. खूनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी दारूच्या नशेत झालेल्या वादावादीतून हा खून झाल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. ही घटना मजले ता. हातकणंगले(Hatkanangale)गावच्या हद्दीतील मांगाची कुडी म्हणून ओळखल्या जात असलेल्या शेतजमिनीमध्ये घडली. या घटनेतील संशयीत आरोपी दिपक जगन्नाथ कांबळे ( मर्फी ) रा. नेज शिवपुरी याला हातकणंगले पोलिसांनी जेरबंद केले असून या गुन्हाची नोंद हातकणंगले पोलीसात झाली आहे.
centring worker crime case in Hatkanangale kolhapur marathi news
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी
हातकणंगले - कुंभोज रस्तालगत पाटणी फार्म हाऊसच्या पुर्वेला मजले गावच्या हद्दीत मांगाची कुडी म्हणून ओळखल्या जात असलेल्या शेतामधील सनदी यांचा घरांत गेल्या कित्येक वर्षापासून गावठी दारू विक्रीचा अड्डा राजरोसपणे सुरू आहे. आज दुपारी मयत राजू जाधव हा दारू पिण्यासाठी तेथे गेला होता, त्याच ठिकाणी दिपक कांबळे हा अगोदरच दारू पिऊन तरर झाला होता. दोघे एकाच गावचे असल्याने दोघाचीही ओळख होती. दारू पिल्यानंतर या दोघामध्ये वाद झाला. यातून कडाक्याचे भांडण झाले. यावेळी झालेल्या हाणामारीत संशयित दिपक याने राजूच्या डोक्यात दगड घातला, वर्मी घाव बसल्याने राजू जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. व गतप्राण झाला.
हेही वाचा- पन्हाळ्यातील प्रकार व्हायरल; ‘गोकुळ’ मधील भांडवली गुंतवणूक चव्हाट्यावर
राजू हा विवाहीत असून तो सेंट्रीग काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता. त्याला दारूचे व्यसन जडल्याने त्याची पत्नी व मुलगा माहेरी राजू पासून विभक्त राहतात तर संशयीत आरोपी दिपक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात हातकणंगले पोलीसामध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.घटनास्थळी खोलीमध्ये व खोलीच्या बाहेर मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याच्या खूणा दिसत होत्या तर दरवाज्यात राजूची चप्पल व लाकडी दांडके पडले होते.
या घटनेची माहीती समजताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे परि.पोलीस उपअधिक्षक साहील झरकर, पीएसआय सीमा बडे, महादेव खेडकर, संग्राम पाटील, अतुल निकम, प्रकाश लाड, कुलदीप मोहीते, भूषण शेटे व आय बाईकचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेतील संशयीत आरोपी दिपक कांबळे ( मर्फी ) याला काही वेळातच जेरबंद केले. मयत राजू जाधव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, या घटनेची माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. या खूनाची नोंद हातकणंगले पोलीसात झाली असून पोलीस या गुन्हात एकच आरोपी आहे का आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेत आहेत.
centring worker crime case in Hatkanangale kolhapur marathi news
Web Title: Centring Worker Crime Case In Hatkanangale Kolhapur Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..