गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र यात्रेचा शुभारंभ!

मुख्य यात्रा १६ ला. निगवे दुमाला येथील मानाची सासनकाठी डोंगरावर दाखल
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र यात्रेचा शुभारंभ!

जोतिबा डोंगर : चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता. पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा शुभारंभ झाला .यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या उभ्या करण्यात आल्या. १६ एप्रिलला जोतिबा देवाची मुख्य यात्रा असून कामदा एकादशी दिवशी यात्रेसाठी भाविक येण्यास सुरुवात होईल. आज गुढीपाडव्यानिमित्त श्री जोतिबा देवाची सरदारी राजेशाही थाटातील महापूजा बांधण्यात आली .

सकाळी अकरा वाजता निगवे दुमाला ता. करवीर येथील हिम्मत बहाद्दूर चव्हाण सरकार यांची मानाची सासनकाठी मिरवणुकीने मंदिरात दाखल झाली. मी मुख्य मंदीरात आल्यानंतर जोतिबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करण्यात आला. गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली .यावेळी रणजितसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण रणवीरसिंह चव्हाण तसेच सरपंच राधा बुणे देवस्थान समितीचे समितीचे अधीक्षक दीपक मेहतर कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड पुजारी ग्रामस्थ भाविक उपस्थित होते .हिंमतबहाद्दूर चव्हाण सरकार यांच्या सासनकाठीच्या मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा काढताना भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली. मच्छींद्र डवरी गजानन डवरी विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते गायली. सासनकाठी सदरेजवळ उभी केल्यानंतर प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. दुपारी बारा वाजता मुख्य मंदिरातील ज्योतिर्लिंग मंडपात केदारी उपाध्ये यांनी पंचांग वाचन केले.

दरम्यान, निनाम पाडळी ( सातारा) विहे (पाटण ) कसबे डिग्रज( ता. मिरज) कसबा सांगाव ( ता.कागल) किवळ ता. (कराड )छत्रपती करवीर कवठेगुलंद (सांगली) मनपाडळे (ता.हातकणंगले ) तसेच सांगली सातारा सोलापूर बार्शी पंढरपूर लातूर आदी भागातील सासन काठ्या त्या त्या गावात दिमाखात उभ्या करण्यात आला. तसेच या गावातील प्रमुखांनी चैत्र यात्रेसाठी केव्हा जायचे याचे नियोजन केल्याचे सांगितले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com