चंदगड : अडकूरला भल्यापहाटे हत्तीचे दर्शन

आजरा तालुक्याची हद्द ओलांडून काल दिवसभर गडहिंग्लज तालुक्यात धुमाकूळ
काल दिवसभर गडहिंग्लज तालुक्यात धुमाकूळ
काल दिवसभर गडहिंग्लज तालुक्यात धुमाकूळsakal

चंदगड : आजरा तालुक्याची हद्द ओलांडून काल दिवसभर गडहिंग्लज तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या हत्तीने आज भल्या पहाटे चंदगड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला. अडकूर ( ता. चंदगड ) येथे नागरिकांना हत्तीचे दर्शन घडले. गडहिंग्लज हद्दीतील सरोळी गावची सीमा ओलांडून, घटप्रभा नदी पार करून हत्तीने गणूचीवाडी,

आमरोळी इथपर्यंत प्रवास केला. तिथून चंदगड- गडहिंग्लज मार्ग ओलांडून तो उत्साळी, अलबादेवीच्या दिशेने पुढे गेल्याचे नागरिकांनी सांगितले. अडकूर परिसर हा चंदगड तालुक्याला मध्यवर्ती आहे. गेले सुमारे दोन दशकापासून या तालुक्यात हत्तींचा वावर आहे. मात्र या परीसरात प्रथमच हत्तीचे दर्शन झाले. तो आपल्या मार्गाने सरळ पुढे चालत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याच्याकडून नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com