चंदगडचा फौजदार ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांमध्ये वाद आहे.
फौजदार
फौजदारsakal

चंदगड : चंदगड पोलिस ठाणेअंतर्गत पाटणे फाटा (ता. चंदगड) पोलिस चौकीतील फौजदार अमित भागवत पांडे वय ३४, मूळ रा. खोतवाडी, ता. हातकणंगले याला वीस हजार रुपयांची लाच घेताना आज लाचलुचपत विभगाच्या पथकाने पकडले.

या विभागाने कारवाईबाबत दिलेली माहिती अशी एका कामासाठी तक्रारदाराकडून त्याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. ४० हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यापैकी २० हजार रुपये घेताना कारवाई करण्यात आली.

तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांमध्ये वाद आहे. या कामी मदत करण्यासाठी संशयित पांडे याने तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. शेवटी चाळीस हजार रुपये देण्याचे तक्रारदाराने कबूल केले. त्याचवेळी त्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. आज या रकमेपैकी वीस हजार रुपये घेत असताना पांडे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकला. लाचलुचपत विभागाच्या पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, पोलिस नाईक सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, कॉन्स्टेबल संदीप पडवळ, मयूर देसाई, सूरज अपराध यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान, पांडे मुंबईहून वीस दिवसांपूर्वी या विभागाकडे बदलीने आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com