esakal | 'कोणतेही झेंडे, बॅच न घेता संभाजीराजें सोबत उभे राहू'
sakal

बोलून बातमी शोधा

'कोणतेही झेंडे, बॅच न घेता संभाजीराजें सोबत उभे राहू'

'कोणतेही झेंडे, बॅच न घेता संभाजीराजें सोबत उभे राहू'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही कोणतेही झेंडे, बॅच न घेता त्यांच्या सोबत उभे राहू, संभाजीराजे छत्रपती हे राजर्षी शाहू महाराजांचे (rajarshi shahu maharaj) वंशज म्हणून त्यांना मान सन्मान भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनीही दिला आहे. असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (chandrakant patil) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील माथेराननगर परीषदेच्या शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत पाटील यांनी केले यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठा आरक्षणावरून (maratha reservation) संभाजीराजे घेत असलेली भूमिकेविषयी पाटील म्हणाले की, संभाजीराजे राजर्षी शाहू महाराजांचे वंशज असल्याने त्यांना भाजप कार्यालयात बोलवून खासदारकी दिलेली नाही, तर राष्ट्रपतींच्या कोट्यातून त्यांना खासदारकी दिली. संभाजीराजे व्यक्ती म्हणून काही करू शकतात, ते करतात त्यांना स्वातंत्र्य आहे. पण त्यांच्या विषयी आम्ही अपशब्द काढणार नाही किंवा टिका करणार नाही. संभाजीराजे असो किंवा अन्य कोणी असो. जे मराठा आंदोलनाचे नेतृत्व करीत त्यांच्या पाठीशी बॅच, झेंडा न घेता त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होणार आहोत. कोणी मराठा नते म्हणाले ‘तुम्ही येऊ नये तर आम्ही येणार नाही, आमचा कोणताही अभिषनिवेश नाही.’

हेही वाचा: मोदी, शहांनी काही तरी शिकावे; जयंत पाटलांच्या व्हिडिओवरुन नेटीझन्सचा सल्ला

पंतप्रधानाना भेट दिली नाही म्हणून संभाजीराजे छत्रपती नाराज आहेत का? यावर पाटील म्हणाले ‘‘ संभाजीराजेनां सन्मान दिला आहे. राज्यात फार कमी गोष्टी लोकांना माहिती असतात. जेव्हा राज्यात तीन राज्यसभा होत्या. तेव्हा संभाजीराजेंना भाजपाच्या कार्यालयात यावे लागले असते. मोदींनी त्यांना शाहूंचे वंशज आहेत म्हणून आपल्या भाजप कार्यालयात बोलवून नव्हे, तर त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले. अलहाबादच्या राष्ट्रीय बैठकीत मोदींसह सर्वांनी उभे राहून त्यांचे अभिनंदन केले.

केंद्र सरकारच्या (central government) कोणत्याही मंत्र्याकडे ते गेल्यानंतर मंत्री उठून उभे राहतात. असे संभाजीराजे सांगतात. त्यांना रायगड विकासचे अध्यक्ष केले. पैसे कसे दिले हे मात्र संभाजीराजे सांगत नाहीत ते लोकांना माहिती नाही. पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधानांकडे त्यांनी चार वेळा भेट मागतली पण भेट नाकारली. असे संभाजीराजे म्हणतात पण तत्त्पूर्वी ते ४० वेळा पंतप्रधान मोदी भेटले आहेत. सध्या कोविडमुळे ते त्यांना भेटत नाहीत, तर ते ज्या मराठा आरक्षणा संदर्भात संभाजीराजे भेट मागतात तो विषयी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी भेटावे असे आहे. पंतप्रधानांनी तुम्हाला भेट दिली नाही असे सांगत कॉंग्रेस, राष्ट्रवादी त्यांना प्रोत्साहित करत आहे. तरीही संभाजीराजे शाहू महाराजाचे वंशज आहेत आणि त्यांच्याविषयी आदर आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी नेतृत्व करावे आम्ही त्यांच्या सोबत आहोत.’’