esakal | कोल्हापुरात दुकाने सुरु ठेवण्याऱ्यां 98 नागरीक व व्यापाऱ्यांकडून दंड वसूल

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात दुकाने सुरु ठेवणाऱ्या 98 नागरिक व व्यापाऱ्यांकडून दंड वसूल
कोल्हापुरात दुकाने सुरु ठेवणाऱ्या 98 नागरिक व व्यापाऱ्यांकडून दंड वसूल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरामध्ये विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने व दुकाने सुरु ठेवण्याऱ्यां 98 नागरीक व व्यापाऱ्यांकडून 56 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 98 लोकांकडून 56 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल मंगळवारी (ता.20) महापालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क 92 लोकांनकडून 46000, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने 5 नागरीकांकडून 5500 व सांयकाळी 96 नंतर आस्थापना सुरु ठेवलेमुळे 1 व्यक्तिकडून 4500 असे एकुन 56 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही वाचा- VIDEO: श्री अंबाबाई मंदिरातील श्रीराम नवमी उत्सव सोहळा पाहा व्हिडीओ

शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्‍यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Edited By- Archana Banage