esakal | कोरोनाचा लहान गटाला फटका ; शून्य ते 30 वयोगटात पाच हजार बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

 Corona hits small group; Five thousand infected in the age group of zero to 30

लहान मुलांची प्रतिकारशक्‍ती चांगली असते, रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो, असे सांगितले जात असले तरी या गटातही कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे. एकूण कोरोना बाधितांत पाच हजारपेक्षा अधिक कोरोनाबाधित हे 0 ते 30 वयोगटातील आहेत. 

कोरोनाचा लहान गटाला फटका ; शून्य ते 30 वयोगटात पाच हजार बाधित 

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : लहान मुलांची प्रतिकारशक्‍ती चांगली असते, रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो, असे सांगितले जात असले तरी या गटातही कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे. एकूण कोरोना बाधितांत पाच हजारपेक्षा अधिक कोरोनाबाधित हे 0 ते 30 वयोगटातील आहेत. 
असे असले तरी बरे होण्याचे प्रमाणही याच गटात जास्त आहे. याची आकडेवारी बोलकी असून, लहान मुलांना कोरोना झाला तरी घाबरण्याचे काही कारण नाही, असे स्पष्ट होते. 
जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. यानंतर एप्रिल, मे, जूनमध्ये टप्प्याटप्प्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. 
जुलैमध्ये कोरोनाचा विस्फोटच झाला. सप्टेंबरमध्ये उच्चांकी रुग्ण संख्येचे संकेत आहेत. मात्र, या सर्वांत 0 ते 30 वयोगटातील रुग्णसंख्याही लक्षणीय आहे. एकूण रुग्णांच्या जवळपास 30 ते 25 टक्‍के रुग्ण हे या वयोगटातील आहेत, हे विशेष. यात एक दिवसाच्या बाळाचाही समावेश आहे. अनेक प्रकरणांत कोरोनाग्रस्त महिलेची प्रसूती झाल्यावर बाळाचा स्वॅब निगेटिव्ह आला; तर बहुतांश प्रकरणांत कोरोनाग्रस्त पालकांमुळे लहान मुलांना कोरोना झाला आहे. 
शून्य ते 30 वयोगटातील रुग्णांना कोरोना झाला असला, तरी बहुतांश रुग्णांत कोरोना लक्षणाचा अभाव असल्याचे आरोग्य विभागाला आढळले. या रुग्णांचा कोरोना किरकोळ उपचारातूनच बरा झाला. या रुग्णांना ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटर लावण्याचे प्रमाणही नगण्य आहे. एखाद्या बालकाला उपजतच काही आजार असतील, त्या केसेसमध्येच अधिकचा उपचार करावा लागला. शून्य ते 20 वयोगटातील रुग्णसंख्या मोठी असताना एकही रुग्ण दगावलेला नाही. फक्‍त 20 ते 30 वयोगटातील दोन हजार 778 रुग्णांपैकी केवळ दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. 


वयोगट वर्षे कोरोनाबाधित मृत्यू 
*0 ते 5 वर्षे 341 0 
*6 ते 10 वर्षे 445 0 
*11 ते 20 1382 0 
*21 ते 30 2778 2 
------------------------------------------ 
एकूण बाधित 4946 2

मुलांची प्रतिकारशक्‍ती चांगली असते. सहजासहजी ते एखाद्या रोगाला बळी पडत नाहीत. कोरोनाचाच विचार केला तर लहान गटात कोरोनाबाधितांची संख्या ही लक्षणीय आहे. मात्र, बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. संसर्गामुळेच बहुतांश लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसते. शून्य ते 20 वयोगटात एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे शून्य ते 30 वयोगटात कोरोना झाला तरी घाबरण्याचे कारण नाही. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी 
 

loading image
go to top