'काहींनी धीर दिला तर काहींनी खडे बोल ऐकवले', गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांचं कोरोनाकाळातील आयुष्य

'काहींनी धीर दिला तर काहींनी खडे बोल ऐकवले', गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांचं कोरोनाकाळातील आयुष्य

कोल्हापूर : ‘‘कोरोना रुग्णांच्या (covid-19 patients) घरात गॅस सिलिंडर (gas cylender emplyees) द्यायला जायचा अवकाश, शेजारी-पाजारी लगेच ओरडायचे, त्यांच्या घरात जाऊ नका. त्याकडे दुर्लक्ष करतच आम्ही सिलिंडर घरात पोच करतो, ज्या ग्राहकांनी सिलिंडरसाठी नाव नोंदवले आहे. त्याला सिलिंडर घरपोच करणे, आमचे कर्तव्य आहे. वर्षभर कोरोनाच्या काळात आम्ही हरप्रकारची माणसे अनुभवली आहेत. ज्यांनी या कामासाठी आम्हाला धीर दिला आणि काहींचे खडे बोलही ऐकावे लागले’’, गॅस सिलिंडर घरपोच करणारे कर्मचारी दिनेश वळवी सांगत होते.

शहरात विविध गॅस एजन्सी (gas agency) असून, तिथे काम करणारे कर्मचारी मध्यमवर्गीय आहेत. कुटुंबाचा खर्च पेलण्यासाठी सिलिंडरचे ओझे खांद्यावर ते वाहतात. वर्षभर कोरोना महामारीचा काळ त्यांनी अनुभवला आहे. कुटुंबीयांकडून या कामाला नकारघंटा वाजविली. मात्र, त्यांची समजूत काढून ते काम करण्यास तत्पर झाले. सिलिंडर पोच करण्यासाठी कोणत्या भागात फिरावे लागेल, याची त्यांना कल्पना नसते. त्या भागात एखादा कोरोना रुग्ण असला तरी त्यांना कामात कसूर करून चालत नाही. विशेष म्हणजे थेट कोरोना रुग्णाच्या घरातच त्यांना सिलिंडर नेऊन द्यावे लागते. वळवी यांच्याप्रमाणे एजन्सीकडील सर्व कर्मचारी जीव धोक्यात घालून हे काम करत आहेत. ड्यूटीवर येताच अंगावर पोशाख चढवायचा. सिलिंडरची गाडी घेऊन दारोदार जायचे. सिलिंडर पोच केल्यानंतर स्वतःला सॅनिटाइझ करायचे.

'काहींनी धीर दिला तर काहींनी खडे बोल ऐकवले', गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांचं कोरोनाकाळातील आयुष्य
कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रोटिन्सचं रुटीन ठरतंय फायद्याचं

कपडे धुऊन अंघोळ करायची आणि मगच घरचा रस्ता धरायचा, असा त्यांचा दिनक्रम आहे. वळवी मूळचे नंदूरबार जिल्ह्यातील (nandurbar district) धानोरा इथले. २३ वर्षांपूर्वी ते कोल्हापुरात आले. तेव्हापासून ते याच व्यवसायात आहेत. त्यांची मुलगी दीपिका बीएस्सी ॲग्री असून, तुषार व तेजस्विनी बारावीत आहेत. त्यांचे वडील गावी आहेत. वर्षभरात ते केवळ एकदाच वडिलांना भेटून आले आहेत. ‘दिवसभरात सुमारे पन्नास घरांत सिलिंडर पोचवावे लागतात. याआधी या कामाची कधीच भीती वाटली नव्हती.

कोरोनाचा प्रादुर्भाव (covid-19 sistuation) सुरू झाल्यानंतर मात्र कुटुंबीयांची काळजी वाटायला लागली. आपण दारोदार भटकून पुन्हा घरात जाणार. आपल्यामुळे अन्य कोणाला संसर्ग झाला तर असा विचार डोक्यात यायचा. मात्र, कुटुंबासाठी काम करावे लागणार होते. त्यामुळे सुरक्षितपणे काम करायचे ठरवले. शासनाचे आदेश पाळून आजही काम करतोय. काही लोक आम्हाला थेट कोरोना रुग्णाच्या घरी जाण्यास अडवतात. त्यामागे त्यांची भावना चांगली असली तरी आम्हाला आमच्या कामात कमी पडून कसे चालेल?,’’ एवढे बोलून वळवी पुन्हा सिलिंडर पोच करण्यासाठी एजन्सीकडे रवाना झाले.

'काहींनी धीर दिला तर काहींनी खडे बोल ऐकवले', गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांचं कोरोनाकाळातील आयुष्य
Paytm वर चेक करा तुमचा सिबिल स्कोअर; फॉलो करा 'या' टीप्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com