Video - उन्हा, पावसातही कामात नाही कसूर; जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांची सेवा

कोरोना काळात वीज खंडित झाल्यावर कर्मचाऱ्यांची धावपळ
Video - उन्हा, पावसातही कामात नाही कसूर; जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांची सेवा

कोल्हापूर : वीजपुरवठा खंडित (electricity) झाल्याचा इमर्जन्सी कॉल (immergency call) येण्याचा अवकाश, दुरुस्तीसाठीचे साहित्य घेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांची ( MSCDCL emplyees) धावपळ सुरू होते. एखाद्या ट्रान्स्फॉर्मरवर बिघाड झाला असेल, तर लगेच त्याची दुरुस्ती त्यांच्याकडून सुरू होते. कोविड रुग्णांच्या (covid-19 patients) कुटुंबातून वीज खंडित झाल्याची तक्रार आली तरी त्या घरात जाऊन कर्मचारी वीज पूर्ववत करतात. उन्हाचा तडाखा असो, की मुसळधार पाऊस (heavy rain) त्यांना कामात कसूर करून चालत नाही. वर्षभर कामाचा हा अनुभव महावितरणचे कर्मचारी घेतात. बापट कॅम्प (bapat camp) येथील जाधववाडी व रुईकर कॉलनी उपकेंद्रावर कर्मचारी डोळ्यांत तेल घालून काम करत आहेत. ही स्थिती अन्य उपकेंद्रांवरही पाहायला तर मिळतेच.

बापट कॅंपवरील उपकेंद्रावर सचिन गंगापुरे सहायक अभियंता. लोणार वसाहत, मार्केट यार्ड, कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी परिसर उपकेंद्राच्या अखत्यारीत येतो. जाधववाडी व रुईकर कॉलनी उपकेंद्रावर (sub center of ruikar colony) एकूण बत्तीस कर्मचारी काम करतात. पैकी दोन्ही केंद्रांवरील एकूण आठ कर्मचारी इमर्जन्सी सेवेत शिफ्टनिहाय काम करतात. विशेष म्हणजे उपकेंद्राच्या अखत्यारीत तीन कोविड सेंटर (covid centre) आहेत. तिथला वीजपुरवठा सुरळीत राहील, याची खबरदारी घ्यावी लागते. तसेच स्पार्किंग, फिडर बंद, वादळाने तुटलेल्या वायरींच्या इमर्जन्सी कॉललाही सामोरे जावे लागते. वर्षभरात असे किमान तीन हजार इमर्जन्सी कॉल येत असल्याचे गंगापुरे सांगतात.

Video - उन्हा, पावसातही कामात नाही कसूर; जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांची सेवा
रुग्णांना बसणार आर्थिक फटका; एचआरसिटी दरात पुन्हा वाढ

‘मी मूळचा तुळजापूरचा (tuljapaur) आहे. आई-वडील, दोन भाऊ तिकडे शेती करतात. मी सहा वर्षांपूर्वी महावितरणमध्ये रुजू झालो. कदमवाडी गणेश पार्क येथे पत्नी व मुलग्यासह भाड्याच्या खोलीत राहतो. दिवाळीत आई-वडिलांना भेटून आलो. रोज ते मोबाइलवरून माझी विचारपूस करतात. कोरोना रुग्ण वाढत असले तरी काम करतो. कोरोना रुग्णांच्या (corona patients) घरी जाऊन तांत्रिक बिघाड दुरुस्त करतो. सुरवातीला घरी जाताना भीती वाटायची. आता ती नाही. इमर्जन्सी कॉल आला की, वीज ग्राहकांच्या घरी जातो. वीज पूर्ववत करतो,’ विकास सूर्यवंशी यांनी कुटुंबीयांसह कामाची रूपरेषा मांडली.

‘मी दीड वर्षांपासून कंत्राटी कामगार (contract basis) म्हणून काम करत आहे. दररोज पेठवडगाव येथून मी कामावर येतो. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून माझ्या कुटुंबीयांना माझी काळजी आहे. दारात गेल्यावर अंघोळ करूनच मला घरात प्रवेश करावा लागतो. वीज ग्राहकांच्या घरी जाऊन तिथला बिघाड तपासावा लागतो. या ग्राहकांपैकी कोण कोरोना पॉझिटिव्ह आहे, याची माहिती असत नाही. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावूनच काम करतो. आम्हीसुद्धा माणूस आहोत, हेच अनेकजण विसरतात,’ कर्मचारी गणेश पाटील पोटतिडकीने बोलले.

Video - उन्हा, पावसातही कामात नाही कसूर; जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांची सेवा
अख्तर बोलले, ट्रोल झाले, 'सरकारचं कौतूक पडलं महागात'

"काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसात भोसलेवाडी चौकातील खांब कोसळला. परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. रात्री साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांनी तो खांब बाजूला करून वीजपुरवठा पूर्ववत केला. रात्री कधीही इमर्जन्सी कॉल आला तरी कर्मचारी कामात कसूर करत नाहीत."

- सचिन गंगापुरे, सहायक अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com