Covid Impact: शाळांचा बदलला पॅटर्न; असे झाले बदल

ऑनलाइन अध्यापन, अध्ययनाला गती; शाळांनीही बदल त्वरित स्वीकारले
Education
Education

कोल्हापूर : कोरोनाने गेल्या वर्षीपासून शैक्षणिक वेळापत्रकच बदलले. एवढेच नव्हे तर ऑनलाईन अध्ययन-अध्यापन हा नवा पर्याय शाळांत सुरू झाला. यंदा काही शाळांनी परीक्षाही ऑनलाईन घेतल्या. यासाठीचे प्रशिक्षणही शिक्षकांना दिले. पारंपरिक चौकटीबाहेर पडून शाळांनी कोरोनानिमित्ताने पॅटर्न बदलला, सर्वांनी सकारात्मकपणे तो स्वीकारला, असे चित्र खासगी व अनुदानित शाळांत दिसते.

कोरोनामुळे शालेय शिक्षणातही बदल झाले. खासगी आणि काही अनुदानित शाळांनी हे बदल स्वीकारले. मुलांना वर्गात एकत्र येता येणार नाही, हे ओळखून त्यांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरवात केली. यासाठी पहिल्यांदा शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले. व्हिडिओ कसे तयार करायचे, त्यात चित्रपूरक माहिती यांचा कौशल्याने वापर कसा करायचा, याची माहिती शिक्षकांना दिली.

विद्यार्थ्यांनाही ऑनलाईनमुळे स्वप्रेरणेने अभ्यास करण्याची सवय लागली. आता बहुतांश शाळांनी परीक्षाही ऑनलाइन घेतल्या आहेत. कोरोनामुळे पारंपरिक चौकट मोडून शाळांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे नवे बदल स्वीकारले आहेत.इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय ऑनलाईन शिकवताना त्यातील धड्यांना पूरक व्हिडिओ शिक्षक दाखवतात. त्यामुळे अध्ययन अधिक रंजक होते. विद्यार्थी लक्षपूर्वक हे विषय शिकतात.

हे बदल झाले

अभ्यासक्रम ऑनलाईन झाला.

पालकांचे व्हाट्‌सअॅप ग्रुपकरून त्यावर शैक्षणिक माहिती

ऑनलाइन प्रश्नपत्रिका तयार झाल्या

मुलांचे घरातच एका जागी बसून अध्ययन

शालेय शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर वाढला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com