कोल्हापूर : दोघांवर प्राणघातक हल्ला, रिंकू देसाईसह १२ जणांवर गुन्हा

वर्चस्ववाद आणि पोस्टर लावण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला
Rinku Desai
Rinku DesaiSakal

कोल्हापूर - लक्षतीर्थ वसाहत येथील दोघांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात विजय ऊर्फ रिंकू देसाईसह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वर्चस्ववाद आणि पोस्टर लावण्याच्या कारणावरून काल रात्री हा प्रकार घडला. देसाईसह प्रकाश बोडके, रामचंद्र बोडके, तानाजी फाले, लक्ष्मण येडगे, बाबुराव गावडे, नितीन वरेकर, प्रथमेश जानकर, सागर बोडेकर, तानाजी शेळके, सुनील बोडके, चंदर बोडके (सर्व रा. बोंद्रेनगर) अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की कृष्णात कोंडीबा बोडेकर (वय २७) हे लक्षतीर्थ वसाहत येथील सासने कॉलनीत राहतात. त्यांच्या शेजारी संतोष सोनबा बोडके राहतात. दरम्यान, संशयित रिंकू देसाईचा काल वाढदिवस होता. त्याने कृष्णांत व संतोष यांना ‘माझा वाढदिवस आहे. रिंगरोडला स्वतःच्या खर्चाने माझ्या वाढदिवसाचे पोस्टर लाव, नाही लावल्यास तर तुझ्याबद्दल मला वेगळा विचार करावा लागेल.’ असे धमकावले. त्यानंतर काल रात्री संशयितांनी बेकायदेशीर जमाव करून कृष्णांत यांना घरातून बाहेर ओढून त्यांच्यावर तलवार, गज, दगड, लाकडी दांडक्याने हल्ला केला.तसेच शेजारी राहणाऱ्या संतोष यांनाही मारहाण केली. यामध्ये आम्ही दोघेही गंभीर जखमी झालो. अशी फिर्याद जखमी कृष्णांत बोडेकर यांनी दिली. त्यानुसार १२ संशयितांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर लक्षतीर्थ वसाहत आणि बोंद्रेनगर रिंगरोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा भाग म्हणून तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी काल रात्रीच घटनास्थळावरून काठ्या, दगड, गज आदी साहित्य ताब्यात घेतले. संशयितांच्या शोधासाठी पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून संशयितांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com