esakal | स्वयंघोषित तंटामुक्त पदाधिकार्‍यावर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

स्वयंघोषित तंटामुक्त पदाधिकार्‍यावर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : वडरगे (ता. गडहिंग्लज) येथे कोणतीही ग्रामसभा न घेता आणि ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव नसताना तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे डिजीटल फलक उभारुन गावातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोघांवर पोलिसात महाराष्ट्र विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. नामदेव पोवार व बाळासाहेब गोरुले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोवार व गोरुले यांनी स्वत:च तंटामुक्त अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड झाल्याचे जाहीर केले. त्यांच्यासह साई तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील एका संस्थेजवळ या स्वयंघोषित निवडीसंदर्भात ग्रामपंचायतीची परवानगी न घेता मोठा डिजीटल फलक लावला.

या माध्यमातून गावातील विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्ष, ग्रामस्थांच्या भावना दुखावून दुफळी निर्माण करुन शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोवार व गोरुले यांच्याविरुद्ध ठेवण्यात आला आहे. पंधरा दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेची फिर्याद सुभाना हजारे यांनी पोलिसात दिली आहे. हवालदार मारुती मुळीक अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top