शेतजमिनीच्या वादातून मारहाण; भाच्याला वाचवायला गेलेल्या मामाचा निर्घृण खून

संशयितांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये असलेल्या मुलगा प्रतिकलाही दगडाने मारहाण केली
kolhapur
kolhapuresakal
Summary

संशयितांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये असलेल्या मुलगा प्रतिकलाही दगडाने मारहाण केली

देवाळे - शासनाकडून मिळालेल्या शेतजमिनीच्या पैशाच्या वाटणीवरुन आवळीपैकी (aavli, Panhala) पोवारवाडी येथे झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचवायला गेलेल्या मामाचा खून झाला आहे. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७०, आवळी पैकी पोवारवाडी ता.पन्हाळा) असे मृत मामाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी प्रविण सुभाष पाटील, प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील (तिघे, रा. आवळी पैकी पोवारवाडी) आणि दिलीप शामराव गराडे (रा. पैजारवाडी) या चौघांना कोडोली पोलीसांनी अटक केली आहे. या खूनाने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime Case)

kolhapur
'सेनेच्या अस्तित्वाला कोणी हात घातला तर शिवसैनिक पेटून उठतील'

पोलिसांकडून (Police) मिळालेली माहिती अशी की, भगवान महादेव पाटील आणि संशयित आरोपी प्रविण पाटील, प्रदीप पाटील, विश्वास पाटील हे एकाच गावातील असून एकमेकाच्या घरासमोर राहतात. यांच्यामध्ये गट नंबर ७४१ (अ) मधील कोल्हापूर – रत्नागिरी रोडसाठी भुसंपादित जमिनीला शासनाकडून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन गेले पंधरा दिवसापासून वाद सुरु होता. रविवारी (१३) भगवान पाटील हे रात्री साडेनऊच्या सुमारास घराचे दारात हातपाय धुत असताना संशयित आरोपी प्रविण पाटील याने शिवीगाळ करुन भगवान पाटील यांना काठीने मारहाण केली. हा वाद ऐकून त्यांची पत्नी व मामा रघुनाथ ज्ञानु पोवार भांडण सोडवण्यासाठी गेले असता सर्व संशयित आरोपींनी रघुनाथ पोवार यांना बेदम मारहाण केली. यामध्ये रघुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच संशयितांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये असलेल्या मुलगा प्रतिकलाही दगडाने मारहाण केली. या घटनेनंतर जखमी भगवान पाटील यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन संशयित आरोपींना अटक केली. आज सोमवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

kolhapur
संसद सुरू होताच खासदारांच्या 'मोदी मोदी' घोषणा, ओम बिर्ला म्हणाले.. 'झालं का?'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com