इचलकरंजीत अज्ञाताकडून ATM फोडण्याचा प्रयत्न

संशयीत चोरटा सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे
इचलकरंजीत अज्ञाताकडून ATM फोडण्याचा प्रयत्न

इचलकरंजी : येथील राजर्षी शाहू पुतळा परिसरातील ॲक्सीस बँकेचे एटीएम (ATM) फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसल्याने मोठी रक्कम सुरक्षित राहिली. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (crimecase) संशयीत चोरटा सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

येथील शाहू पुतळा परिसरात अॅक्सीस बँकेचे एटीएम सेंटर आहे. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटा या एटीएम सेंटरमध्ये घुसला. त्याने रॉडच्या सहाय्याने एटीएम मशिनचा समोरचा दरवाजा उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबतची तक्रार बँक कर्मचारी नितीन बाळगोंडा पाटील (वय ४०, रा. गावभाग) यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे. सीसीटिव्हीमध्ये चोरटा कैद झाला आहे. त्याच्यावर वर्णनावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

इचलकरंजीत अज्ञाताकडून ATM फोडण्याचा प्रयत्न
'माहिती न घेता आवाडेंनी सनसनाटी वक्तव्ये टाळावीत'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com