कोल्हापुरात 'एसटी गँग'च्या 12 जणांना मोक्का; राजारामपुरी पोलिसांची धडक कारवाई

४१ विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली
कोल्हापुरात 'एसटी गँग'च्या 12 जणांना मोक्का; राजारामपुरी पोलिसांची धडक कारवाई

कोल्हापूर : संघटित गुन्हे (crime) अंतर्गत 'एसटी गँग' (ST gang) च्या संशयित साईराज जाधवसह १२ जणांवर मोका अंतर्गत पोलिसांनी (kolhapur police) कारवाई केली. याबाबतचा प्रस्ताव राजारामपुरी पोलिसांनी दाखल केला होता. त्याला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहू टोल नाका परिसरातील हॉटेल (hotel businessman) व्यवसायिकावर ६ एप्रिलला तलवार, ऐडका, हॉकी स्टिकने हल्ला झाला होता. यात हल्लेखोरांनी वाहनांची तोडफोडही केली होती. याप्रकरणी 'एसटी गँग' च्या सदस्यांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गँग विरोधात २०११ पासून राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर, जयसिंगपूर, गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, सरकारी नोकरावर हल्ला, जबरी चोरी, दुखापत असे ४१ विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली.

कोल्हापुरात 'एसटी गँग'च्या 12 जणांना मोक्का; राजारामपुरी पोलिसांची धडक कारवाई
'ती' दु:खद वार्ता कानावरती पडताच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला अन् शाहूराजांच्या आठवणीने कोल्हापूर पुन्हा गहिवरला!

त्यानुसार या गँग विरोधात मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव शहर पोलिस उप-अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांनी तयार केला. तो पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे (shailesh balkawade) यांच्या मार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक लोहिया यांनी मंजूर केला. त्यानुसार संशयित साईराज दीपक जाधव, ऋषिकेश ऊर्फ गेंड्या बाबासाहेब चौगुले, आसू बादशाह शेख, अर्जुन बिरसिंग ठाकूर, नितीन ऊर्फ बॉब दीपक गडीयाल, जब्बा ऊर्फ विराज विजय भोसले, पंकज रमेश पोवार, प्रसाद जनार्दन सुर्यवंशी, करण उदय सावंत, विशाल प्रकाश वडर, रोहित बजरंग साळोखे, रामु मुकुंद कलकुटगी या १२ जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे सावंत यांनी सांगितले.

महिन्यात कारवाई

गुन्हा दाखल झाल्यानंतर जब्बा ऊर्फ विराज, पंकज, विशाल हे सोडून इतर नऊ संशयितावर राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली. अवघ्या महिन्यातच संशयितावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. यावर्षातील ही मोका अंतर्गत दुसरी कारवाई असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.

कोल्हापुरात 'एसटी गँग'च्या 12 जणांना मोक्का; राजारामपुरी पोलिसांची धडक कारवाई
गावच्या दूध संस्थेचा सचिव कसा झाला गोकुळचा संचालक; बयाजी शेळके यांचा प्रवास

"गुन्हेगारी प्रवृत्तीसह फाळकूट दादांविरोधात कोणतेही भय न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी द्याव्यात."

- शैलेश बलकवडे (पोलिस अधीक्षक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com