Kolhapur : इचलकरंजीत पालकांची ९ लाखांची फसवणूक; आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आमिष

संशयित बंगळूरच्या नवीन बी. लिंगायत, बमा पाडा माजी ऊर्फ समीर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, तर दिल्लीचा अरुण गोसावी हा रेड फ्लॉवर नावाची कन्सल्टन्सी चालवतो.हे तिघे अनेकांना हाताशी धरून ॲडमिशन करून देतो म्हणून फसवणूक करतात.
satta mataka frud
satta mataka frudsakal

इचलकरंजी - मुलींना आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे आमिष दाखवून दोन पालकांची तब्बल ९ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी येथील एका खासगी क्लासचालकासह चार जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अवधूत कुंभार (रा. कोल्हापूर सध्या रा. कलानगर इचलकरंजी), नवीन बी लिंगायत, बमा पाडा माजी ऊर्फ समीर (दोघे रा. बंगळूर), अरुण गोस्वामी (रा. नवी दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत.

शिवाजीनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात अवधूत कुंभार हा इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश अभ्यासक्रमाचे खासगी क्लास चालवतो. यातून त्याच्याशी रशिद कलावंत व त्याचा मित्र जयवंत म्हेत्तर यांची ओळख झाली. दोघांच्या मुलींना कुंभार याने बंगळूर येथील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करून देतो असे सांगितले.

यासाठी बंगळूरच्या नवीन बी लिंगायत, बमा पाडा माजी ऊर्फ समीर यासह दिल्लीचे अरुण गोसावी हे मेडिकल कॉलेजचे संचालक असल्याचे सांगत भेट घालून दिली. चौघाजणांनी अ‍ॅडमिशन करून देतो म्हणून सांगत १४ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम घेतली. सुरुवातीला बंगळूर येथे दोघांकडून रोख तीन लाख आणि दोन लाखांचे धनादेश घेतले.

तसेच इचलकरंजीत परतल्यावर आणखी लाखो रुपये बँक खात्यात पाठवण्यास सांगितले. मात्र, अनेक दिवस झाले तरी अ‍ॅडमिशन करून दिले नाही. त्यामुळे १४ लाख ४५ हजार रुपयांपैकी ४ लाख ८० हजार परत दिले.

उर्वरित ९ लाख ६५ हजार सदरची रक्कम न देता फसवणूक केली. याप्रकरणी रशिद दस्तगीर कलावंत (वय ४२, रा. गुरूकन्नननगर, पाटील गल्ली) यांच्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

टोळीचा अनेकांना गंडा

संशयित बंगळूरच्या नवीन बी. लिंगायत, बमा पाडा माजी ऊर्फ समीर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, तर दिल्लीचा अरुण गोसावी हा रेड फ्लॉवर नावाची कन्सल्टन्सी चालवतो.

हे तिघे अनेकांना हाताशी धरून ॲडमिशन करून देतो म्हणून फसवणूक करतात. शहरातील क्लाससंचालक कुंभार यांना हाताशी धरले आणि शहरातीलच दोन पालकांची त्यांनी फसवणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com